‘त्याने माझा रेकॉर्ड मोडावा अशी माझी इच्छा, पण…’, पाकिस्तानी गोलंदाजाचा उमरान मलिकला सल्ला

'त्याने माझा रेकॉर्ड मोडावा अशी माझी इच्छा, पण...', पाकिस्तानी गोलंदाजाचा उमरान मलिकला सल्ला

इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये एकापेक्षा एक युवा वेगवान गोलंदाजांचा भरणा आहे. यामध्ये जम्मू- काश्मीरच्या उमरान मलिक याचाही समावेश आहे. उमरान आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळतोय. त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने भल्याभल्यांना फलंदाजांना घाम फोडला आहे. त्यामुळे हा प्रतिभावान गोलंदाज लवकरच भारताच्या राष्ट्रीय संघाकडून खेळेल, असे म्हणले जात आहे. अशात त्याला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने मोलाचा सल्ला दिला आहे.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यालाही विश्वास आहे की, उमरान मलिक (Umran Malik) भारतासाठी लवकरच खेळेल. अख्तरला वाटते की, उमरान वेगवान गोलंदाजीसाठीच बनला आहे. मात्र, त्याने सल्लाही दिला आहे की, त्याला यादरम्यान दुखापतींपासून दूर राहिले पाहिजे. वेगवान गोलंदाजीचा विक्रम मोडणाऱ्या अख्तरचा विश्वास आहे की, उमराननेही या यादीत सामील व्हावे.

तो म्हणाला की, “मला त्याची कारकीर्द पुढे जाताना पाहायची आहे. काही दिवसांपूर्वी कोणीतरी माझे अभिनंदन करत होते. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाकलेल्या सर्वात वेगवान चेंडूला २० वर्षे पूर्ण झाली. हा विक्रम अद्याप कोणीही मोडू शकलेले नाही, पण मी म्हणालो, ‘माझा हा विक्रम मोडणारा कोणीतरी असेल.’ उमरानने माझा विक्रम मोडला, तर मला आनंद होईल. मात्र, त्याला या प्रक्रियेत दुखापत होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. मला त्याला दुखापत न होता दीर्घकाळ खेळताना पाहायचे आहे.”

माध्यमांशी बोलताना अख्तर म्हणाला की, “‘मला त्याला जागतिक मंचावर बघायचे आहे. आजच्या युगात ताशी १५० किमीचा वेग सातत्याने ओलांडणारे फारसे गोलंदाज नाहीत. उमरान हा वेग सतत ओलांडत असल्याचे आपण पाहत आहोत. १०० मैल (ताशी १६० किमी) चिन्ह त्याच्या मनात असावे असे मला वाटते. जर त्याने १००मैल क्लबमध्ये प्रवेश केला, तर मला आनंद होईल. मात्र, त्याला दुखापतीपासून दूर राहावे लागणार आहे. यामुळे त्याची कारकीर्द संपुष्टात येऊ शकते.”

त्याच्या गोलंदाजीबद्दल बोलताना अख्तर म्हणाला की, बीसीसीआयने पुढे येऊन भारताच्या या अनोख्या प्रतिभेकडे लक्ष द्यायला पाहिजे. उमरान मलिक मागील वर्षी यूएईमध्ये झालेल्या टी२० विश्वचषकादम्यान भारतीय संघाचा नेट गोलंदाज होता. या वर्षीसाठी त्याला भारतीय संघात निवडण्याची चर्चा होत आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

सनरायझर्स हैदराबाद संघाचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने आयपीएल १५व्या हंगामात खेळताना एकूण १८ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. त्याने या हंगामात सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचाही विक्रम रचला आहे. त्याने तब्बल ताशी १५७ किमी वेगाने चेंडू फेकला होता. त्याचे वेगवान गोलंदाजीतील सातत्य पाहून नेहमीच प्रश्न उपस्थित होत असतात की, वेग हेच त्याचे सर्वात मोठे शस्त्र आहे. उमरान मलिकला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकात भारतीय संघासाठी मोठा दावेदार मानले जात आहे.

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.