इंग्लंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार असून त्यातील शेवटचा सामना शनिवारी (17 डिसेंबर) खेळला जाणार आहे. या मालिकेतील पहिले दोन्ही सामने यजमानांनी गमावले असून आता पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा सर्वात यशस्वी कसोटी फलंदाज अझहर अली याने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यानंतर सर्वात लांबच्या फॉरमॅटमधून निवृत्त होणार असल्याचे जाहीर केले आहे.
अझहर अली (Azhar Ali) याने सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. त्याच्या या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेटने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर पोस्ट केले आहे. त्याने म्हटले आहे की, “माझ्या देशाचे सर्वोच्च स्तरावर प्रतिनिधित्व करणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आणि विशेषाधिकार आहे. निवृत्ती घेणे कठीण असते परंतु, सखोल विचार केल्यावर मला जाणवले की माझ्यासाठी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे.
अझहरने 2010मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच्या 12 वर्षांच्या प्रदीर्घ कसोटी कारकिर्दीत त्याने 19 शतके आणि 35 अर्धशतके ठोकली. कराची येथे इंग्लंडविरुद्धच्या त्याच्या कारकिर्दीतीली शेवटच्या कसोटीत त्याला या संख्येत आणखी भर घालण्याची आणि कसोटी कारकीर्द उंचावण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर त्याने 2016 ते 2020 दरम्यान नऊ वेळा संघाचे नेतृत्वही केले.
Azhar Ali addresses press conference at National Bank Cricket Arena, Karachi.#PAKvENG https://t.co/D0uUC3qOFI
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 16, 2022
पाकिस्तानसाठी कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अझहर पाचव्या क्रमांकावर आहे. या यादीत युनिस खान 10099 धावांसह पहिल्या स्थानावर आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष, रमीझ राजा यांनी अझहरचे अभिनंदन केले आहे. त्यांनी म्हटले, “अझहर अली हा पाकिस्तान क्रिकेटमधील सर्वात वचनबद्ध आणि निष्ठावंत खेळाडूंपैकी एक आहे. त्याची धैर्य आणि दृढनिश्चय अनेक युवा क्रिकेटपटूंसाठी प्रेरणादायी आहे आणि तो नवीन आणि आगामी क्रिकेटपटूंसाठी एक आदर्श आहे.”
Congratulations on a wonderful career, @AzharAli_ 🙌
Read more: https://t.co/1yhv9Y7BXP pic.twitter.com/TRCkqv9Gom
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 16, 2022
अझहरची कसोटी कारकिर्द-
अझहरने आतापर्यंत पाकिस्तानकडून 96 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 42.49च्या सरासरीने 7097 धावा केल्या आहेत. यामध्ये 19 शतके आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची या प्रकारातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नाबाद 302 आहे. जी त्याने 2016मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध दुबईमध्ये केली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कुलदीपने कुंबळे आणि अश्विन यांना मागे पाडले खरे, पण ‘या’ भारतीय गोलंदाजाचा विक्रम अजूनही अबाधित
अश्विनबाबत आईसलँड क्रिकेटचे खळबळजनक ट्वीट! वाचून तुम्हालाही बसेल धक्का