संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईमध्ये नुकतेच पाकिस्तान सुपर लीगचे सहावे सत्र पार पडले आहे. या सत्रातील अंतिम सामना गुरुवारी (२४ जून) रोजी पेशावर झाल्मीची विरुद्ध मुल्तान सुल्तान यांच्यात झाला. मुल्तान सुल्तानने ४७ धावांनी हा सामना जिंकत ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी उपविजेता पेशावर झाल्मीला मोठा धक्का बसला. त्यांचे हैदर अली आणि उम्मेद असिफ या दोन खेळाडूंना कोरोनाचे नियम तोडल्यामुळे अंतिम सामन्यातून निलंबित केले गेले. त्यामुळे ते या महत्त्वाच्या सामन्याला मुकले आहेत.
पाकिस्तान सुपर लीगच्या कोविड व्यवस्थापनाने दोन्ही खेळाडूंना बायोबबलचे नियम तोडल्याने दोषी ठरवले होते. त्यानंतर त्यांना निलंबित केले गेले. यानंतर त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे (पीसीबी) बायोबबलचे उल्लंघन करुन बाहेरच्या व्यक्तींना भेटल्याची कबुली दिली आहे.
पीसीबीने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकेनुसार बुधवारी (२३ जून) रोजी ही घटना घडली. त्यामुळे इतर खेळाडूंचा विचार करता व्यवस्थापनाने अंतिम सामन्यापूर्वी हे पाऊल उचलेले आहे. या प्रतिक्रियेदरम्यान असेही सांगण्यात आले आहे की, बायोबबल तोडल्यानंतर दोन्ही खेळाडू इतर कोणत्याही खेळाडूच्या संपर्कात आले नव्हते आणि दोघांना स्वतंत्र खोलीत विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, पाकिस्तान सुपर लीगनंतर हैदर अली इंग्लंड आणि वेस्ट इंडीजविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी परदेशी दौर्यावर जाणार होता. यासाठी हैदर अलीला पाकिस्तान संघात स्थान देण्यात आले होते. पण आता त्याने नियम बायोबबलच्या नियमांचे उल्लंघन केल्याने पाकिस्तान संघाने त्याला या मालिकेतूनही बाहेर केले आहे. त्याच्याजागी सोहेब मकसूदला सामाविष्ट करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
विशेष म्हणजे, हैदर अलीच्या जागी संघात समाविष्ट असलेल्या शोएब मकसूदने अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने पाकिस्तान सुपर लीगच्या सहाव्या सत्रात ११ सामन्यांत ३६३ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने एकूण ४ अर्धशतके झळकावली असून आतापर्यंत १९ षटकार लगावले आहेत.
महत्वाच्या बातम्या
नवी सुरुवात! आगामी कसोटी चँपियनशीपसाठी टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर, भिडणार ‘या’ संघांशी
‘सर म्हणणे चुकीचे नाही,’ भारतीयांची खिल्ली उडवल्याचा आरोप होत असलेल्या ट्वीटवर मॉर्गनची प्रतिक्रीया
भारतीय संघाच्या पहिल्या विश्वविजेतेपदाची ३८ वर्षे