---Advertisement---

CWC23: तब्बल 7 वर्षांनंतर पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात दाखल, हैदराबाद विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल

On: गुरूवार, सप्टेंबर 28, 2023 9:19 AM
Pakistan-Cricket-Team
---Advertisement---

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी आता फक्त 7 दिवसांचा कालावधी उरला आहे. या विश्वचषकासाठी जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सर्व संघांनी आपले स्क्वॉड घोषित केले आहे. अशात आता विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी एक-एक करून संघ भारतात येत आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात पोहोचला आहे. तब्बल 7 वर्षांनंतर पाकिस्तानी खेळाडू भारताच्या भूमीवर पाय ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. पाकिस्तान संघ लाहोर ते दुबई आणि तिथून 27 सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे पोहोचले.

पाकिस्तान संघाचे भारतात आगमन
पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारतात पोहोचल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याच्यासोबत त्याचा संपूर्ण संघ दिसत आहे. पाकिस्तान संघाला यावेळी कडक सुरक्षेत हैदराबादच्या हयात हॉटेलमध्ये थांबायचे आहे. इथे पाकिस्तान संघाच्या सुरक्षेसाठी हजारो पोलिसांचा फौजफाटा सज्ज असणार आहे. तब्बल 7 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात पोहोचला (Pakistan Cricket Team finally arrived in india) आहे.

यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघ 2016च्या टी20 विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारतात आला होता. पाकिस्तान संघ वनडे विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेपूर्वी पूर्णपणे तयार असल्याचे दिसत आहे. भारतात येण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाचे फोटोही समोर आले होते.

भारतात येण्यापूर्वी पाकिस्तान संघ आशिया चषक 2023 स्पर्धेत खेळताना दिसला होता. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. मात्र, त्यांना उत्कृष्ट प्रदर्शन करता आले नव्हते. त्यांना सुपर- 4 फेरीतील सामन्यानंतर स्पर्धेबाहेर पडावे लागले होते. या स्पर्धेदरम्यान संघाचा वेगवान गोलंदाज नसीम शाह यालाही गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे नसीम शाह विश्वचषकातूनही बाहेर पडला.

असे असले, तरीही नसीमच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज हसन अली याला ताफ्यात सामील करण्यात आले आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ विश्वचषकापूर्वी 29 सप्टेंबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध हैदराबाद येथे सराव सामना खेळणार आहे. (pakistan team finally arrived in india for cricket world cup 2023 see video here)

हेही वाचा-
मालिका जिंकल्यानंतर रोहित वैयक्तिक प्रदर्शनावर खुश! विश्चचषक संघाबाबत दिली खास प्रतिक्रिया
तूच खरा लीडर! पराभवानंतरही रोहितच्या ‘त्या’ कृतीने जिंकले सर्वांचे मन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---