---Advertisement---

तब्बल ९३ वन-डे सामन्यानंतर आॅस्ट्रेलियाचा हा खेळाडू करणार कसोटी पदार्पण

On: बुधवार, ऑक्टोबर 3, 2018 6:59 PM
---Advertisement---

आॅस्ट्रेलिया संघ नियमित कर्णधार स्टीव स्मिथ आणि डेव्हीड वाॅर्नर यांच्या अनुपस्थितीत  पहिल्यांदाच परदेशात कसोटी मालिका खेळण्यास सज्ज झाला आहे. आॅस्ट्रेलिया संयुक्त अरब अमिरातीमध्ये पाकिस्तान विरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

वाॅर्नर आणि स्मिथ यांच्यावर चेंडू छेडछाड प्रकरणी क्रिकेट आॅस्ट्रेलियाने एक वर्षाची बंदी घातली आहे. त्यामुळे ते संघाबाहेर आहेत.

दुबईत आॅस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात पहिला कसोटी सामना 7 आॅक्टोबरपासून सुरु होणार आहे. या सामन्यात अॅराॅन फिंच आणि ट्रेवीस हेड यांना अंतिम 11 जणांच्या संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यास संघाचे प्रशिक्षक जस्टीन लॅंगर यांनी देखील पुष्टी दिली आहे.

दोघांनीही पाकिस्तान अ विरूद्धच्या चार दिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावली आहेत. फिंच उस्मान ख्वाजा सोबत सलामीला खेळेल. तो 93 वन-डे सामने खेळल्यानंतर कसोटी संघात खेळणार आहे. मधल्या फळीतील हेडने 200 चेेंडूंचा सामना करत नाबाद 90 धावा केल्या होत्या.

” फिंचच्या खेळण्यावर माझा पुर्ण विश्वास आहे. त्यामुळे आता फिंचला  अंतिम 11 जणांच्या संघात त्याला स्थान देण्यात येणार आहे. फिंचने वनडे सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. त्याच्याकडे सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांत खेळण्याची क्षमता आहे.”

“ट्रेवीस हेडने मागील सहा महिन्यात चांगली कामगिरी केली आहे. हेड हा फिरकी गोलंदाजीचा सामना  चांगल्या पद्धतीने करतो”. असे लॅंगरने सिडनी माॅर्निंग हेराल्डशी बोलताना सांगितले.

आॅस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानविरूद्ध दोन कसोटी सामन्यानंतर 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मलिका खेळणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment