पाकिस्तान क्रिकेट संघाच्या निवड समित अध्यक्षाच्या रूपात माजी दिग्गज शाहिद आफ्रिदी याला नियुक्त केले गेले आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मोठे फेरबदल झाले, ज्यापैकी एक म्हणजे निवड समितीचे अध्यक्षपद. निवड समितीचा अध्यक्ष बनल्यानंतर आफ्रिदीने संघात बदल करायला देखील सुरुवात केली आहे. आफ्रिदी येत्या काळात जोपर्यंतच्या पदावर कायम असेल, त्या कार्यकाळात त्याला भारताप्रमाणे पाकिस्तान संघाची बेंच स्ट्रेंथ तयार करायची आहे.
भारतीय संघाकडे युवा आणि अनुभवी खेळाडूंची भरमार आहे. बीसीसीआय एकाच वेळी दोन संघांसोबत मालिका खेळू शकते, एवढे खेळाडू सध्या त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. बीसीसीआयने यापूर्वी एकाच वेळी दोन संघ निवडून दोन वेगवेगळ्या मालिका खेळल्या देखील आहेत. आता भविष्यात पाकिस्तान संघ देखील अशा प्रकार दोन संघ तयार करण्याच्या प्रयत्नात असेल. पाकिस्तानच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याने स्वतः याविषयी माहिती दिली.
आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळले जात असल्यामुळे भारतीय संघाकडे भक्कम बेंच स्ट्रेंथ आहे. आता पीसीबी देखील या दिशेने वाटचाल करत आहे. आफ्रिदी याविषयी माध्यमांशी बोलताना म्हणाला की, “मी माझा कार्यकाळ संपण्याआधी पाकिस्ताचे दोन संघ तयार करू इच्छितो. अशात मला संघाची बेंच स्ट्रेंथ मजबूत करावी लागेल. यासाठी युवा खेळाडूंना संघात घ्यावे लागेल. पीसीबीमध्ये यापूर्वी संवादाचा आभाव होता. पण आता मी राष्ट्रीय संघातील खेळाडूंशी वैयक्तिकरित्या बोलत आहे. तसेच युवा खेळाडूंच्या प्रदर्शनावर देखील माझे लक्ष आहे.”
पाकिस्तानचा माजी कर्णदार शाहिद आफ्रिदीने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या संघात बदल केला आहे. निवड समितीचा अध्यक्ष बनल्यानंतर आफ्रिदीने या मालिकेसाठी मोहम्मद जीशान, अराफात मिन्हास आणि बासित अली यांना संघात संधी दिली. याविषयी बोलताना संघाचा भविष्यातील विचार करून या तिघांनी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सामील केल्याच आफ्रिदीने सांगितले. पाकिस्तान जूनियर लीगमध्ये या तिघांचे चांगले प्रदर्शन लक्षात घेता आफ्रिदीने त्यांना संधी दिली आहे. (Pakistan wants to copy India and make the team play, Shahid Afridi’s big statement)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईचा ‘धनुर्धर’ झाला एकदम फिट, बुमराहच्या साथीने संघाला मिळवून देणार सहावी आयपीएल ट्रॉफी
कोणी दुबईत तर कोणी काश्मिरमध्ये! टीम इंडियाचे शिलेदार देश-विदेशात साजरा करतायेत ‘न्यू इयर’; पाहा छायाचित्रे