श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान संघाने त्यांचा पहिला कसोटी सामना ४ विकेट्सने जिंकला. पाकिस्तानसाठी या सामन्यातील पहिल्या डावात कर्णधार बाबर आझम आणि दुसऱ्या डावात अब्दुल्ला शफीक यांनी दोघांनी शतक ठोकले आणि संघाला विजय मिळवण्यासाठी महत्वाचे योगदान दिले. शफीक दुसऱ्या डावात तब्बल ४०० पेक्षा अधिक चेंडूना सामोरे गेला असून या प्रदर्शनासाठी त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शेवटच्या डावात पाकिस्तानला विजयासाठी ३४२ धावांचे लक्ष्य मिळाले होते. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी खेळपट्टीवर आलेला अब्दुल्ला शफीक (Abdullah Shafique) शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने ४०८ चेंडूत १५८ धावा केल्या. शफीकच्या या दमदाक प्रदर्शनाच्या जोरावर पाकिस्तानने शेवटच्या दिवशी विजय मिळवला. बाबर आझमने पहिल्या डावाप्रमाणे या दुसऱ्या डावातही कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. पहिल्या डावात बाबरने २४४ चेंडूत ११९ धावा कुटल्या होत्या. त्यानंतर आता दुसऱ्या डावात त्याने १४४ चेंडूत ५५ धावांची महत्वाची खेळी केली.
An incredible victory for Pakistan 👏
Watch #SLvPAK LIVE on https://t.co/MHHfZPyHf9 with a Test Series Pass (in select regions) 📺#WTC23 | 📝 Scorecard: https://t.co/Zjbsh8Hg2c pic.twitter.com/smrvr7lj0d
— ICC (@ICC) July 20, 2022
पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवाननेही शेवटच्या डावात ७४ चेंडू खेळून महत्वाच्या ४० धावांचे योगदान दिले. श्रीलंकन संघाला हा सामना जिंकता आला नसला, तरी त्यांचा ३० वर्षीय फिरकी गोलंदाज प्रभत जयसूर्याने मात्र विजय मिलवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. पहिल्या डावात प्रभत जयसूर्या (Prabath Jayasuriya) याने ८२ धावा खर्च करून सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच दुसऱ्या डावात त्याने १३३ धावा खर्च करून ४ खेळाडूंना तंबूत धाडले.
— Pakistan Cricket (@TheRealPCB) July 20, 2022
तत्पूर्वी श्रीलंकन संघाचा कर्णधार दिमुथ करूणारत्ने याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात श्रीलंकन संघ २२२ धावा करून सर्वबाद झाला होता. पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने ५८ धावा देत या डावात ४ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानचे फलंदाज देखील पहिल्या डावात अपेक्षित प्रदर्शन करू शकले नाहीत. पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या २१८ धावांवर गुंडाळला गेल्या आणि श्रीलंका चार धावांनी पुढे होता.
श्रीलंकन फलंदाज दिनेश चंदिमल देखील सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. चंदिमलने संघासाठी पहिल्या डावात ११५ चेंडूत ७६ धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने १३९ चेंडूत ९४ धावा केल्या. पहिल्या डावा चेंदिमलने एकटाच होता, ज्याने संघासाठी अर्धशतक ठोकले होते. पण दुसऱ्या डावात कुसल मेंडीस (७६) आणि सलामीवीर ओशादा फर्नांडो (६४) यांनी चंदिमलच्या साथीने अर्धशतकीय योगदान दिले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
युवा खेळाडूंमुळे बदललाय राहुल द्रविडचा स्वभाव, वेस्ट इंडीज दौऱ्यात दिसला नवीन अंदाजात
आता बीसीसीआयचा कारभार सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश चालवणार, वाचा काय आहे प्रकरण
‘मी संघात असतो तर तीन वेळा…’, श्रीसंतने विराट कोहलीला विश्वचषकावरून हिणवले