---Advertisement---

‘या’ अभिनेत्रीमुळे शोएब मलिक सानिया मिर्झाला देणार घटस्फोट! पाहा दोघांचे बोल्ड फोटो

On: शुक्रवार, नोव्हेंबर 11, 2022 4:16 PM
shoaib malik ayesha omar
---Advertisement---

भारताची स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्जा आणि पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी आल्याचे दिसत आहे. पाकिस्तानी माध्यमांमधून बातम्या समोर आल्या आहेत की, लवकरच या दोघांचा घटस्फोट होणार आहे. या जोडप्याच्या एक जवळच्या सूत्रानेही दोघे लवकरच वेगळे होणार असल्याची माहिती माध्यमांना दिली आहे. सानिया आणि शोएब यांच्यात वाढणाऱ्या दुराव्याचे कारण एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे, असे समोर येताना दिसते. 

सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि शोएब मलिक (Shoaib Malik) मागच्या 12 वर्षांपासून एकत्र आहेत. 12 एप्रिल 2010 रोजी त्यांचे लग्न झाले. त्यांना एक मुलगा देखील आहे, ज्याचे नाव इजहान मिर्झा मलिक (Izhaan Mirza Malik) असे आहे. मागच्या मोठ्या काळापासून हे प्रेमी युगल आनंदात संसार करत आहे. पण आता त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे दिसते. माध्यमांमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. पाकिस्ताची एक मॉडेल आणि अभिनेत्री आयशा उमर (Ayesha Omar) सानिया आणि शोएब यांच्यातील नाते तुटण्यास कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.

https://www.instagram.com/p/CWA8ytWDsEG/?utm_source=ig_web_copy_link

 

सानिया आणि शोएबच्या एखा जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या घटस्फोटाची सर्व तयारी झाली आहे आणि लवकच अधिकृत कारवाईदेखील केली जाईल. शेएब मलिक आणि आयशा उमरने मागच्या वर्षी एका पाकिस्तानी मॅगझीनसाठी फोटोशूट केला होता. त्यानंतर या दोघांची मैत्री वाढत गेली आणि अलिकडे त्यांचे संबंध अधिकच जवळचे बनले आहेत. याच कारणास्तव सानिया मिर्झा नाराज असल्याचे सांगितले जात आहे. वृत्तांनुसार शोएब आणि आयशा यांच्यात अफेयर सुरू आहे. मागच्या काही महिन्यांमध्ये या दोघांना एकत्र देखील पाहिले गेले आहे.

https://www.instagram.com/p/CWBAASSjHel/?utm_source=ig_web_copy_link

सध्या सोशल मीडियावर आयशा आणि शोएबचे मागच्या वर्षीचे फोटो व्हायरल होत आहेत, जे त्यांनी मॅगझीनसाठी शूट केले होते. या फोटोंमध्ये आयशा खूपच बोल्ट अंदाजात दिसत आहे. यावेळी तिने शोएब मलिकसोबत स्विमिंग पुलमध्येही फोटो काढले होते. सानिया आणि शोएबमधील दुराव्याच्या बातम्या समोर येताच हे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. (This pakistani actress is the reason of Sania Mirza and Shoaib Malik divorce Photo Goes Viral)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडसाठी टी20मध्ये खेळल्या गेलेल्या 5 सर्वात मोठ्या सलामी भागीदाऱ्या, ‘हा’ पठ्ठ्या सगळ्यात सामील
रोहित शर्मा किती दौऱ्यांमध्ये संघासोबत होता? ‘असे’ चालत नाही! अजय जडेजांची जोरदार टीका  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---