टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या स्पर्धेत पाकिस्तान संघाला नशिबाची साथ लाभली आणि ते उपांत्य फेरीत पोहोचले. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा नेदरलॅंड्सने 13 धावांनी पराभव केल्याने पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीचे दरवाजे खुलले. पाकिस्तानने शेवटचा साखळी सामना बांगलादेशविरुद्ध खेळला. 6 नोव्हेंबरला ऍडलेडवर झालेला हा पाकिस्तानने 5 विकेट्सने जिंकला. उपांत्य फेरीत त्यांचा सामना 9 नोव्हेंबरला न्यूझीलंडशी होणार आहे. संघ उपांत्य फेरीत पोहोचल्याने पाकिस्तानी मीडियच्या आनंदाला सीमाच नाही. ते लागोपाठ चॅनेल्सवर डिबेट शो दाखवत आहे, मात्र यातील एका शोमध्ये अँकरने हद्दच पार केली. ज्यामुळे पाकिस्तानी चाहते नाराज झाले आहेत.
झाले असे की, एका लाईव्ह शो दरम्यान वसीम अक्रम (Wasim Akram) उपस्थित होते. त्यांना त्या कार्यक्रमाच्या अँकरने नॅशनल धोबी म्हटले. ज्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात अक्रम यांच्यासोबत वकार युनूस (Waqar Younis) हे पण आहेत. खरेतर धोबी या घटनेची सुरूवात त्यांनीच केली.
वकार यांनी वसीम अक्रम यांची मजा घेण्यासाठी फॅनने पाठवलेला प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी म्हटले, “एक खूप महत्वपूर्ण प्रश्न आला आहे. तो तुमच्यासाठीच आगे. प्रश्न हा आहे की, एरियलने धुतलेले कपडे खरच साफ होतात का?”
वकारच्या या प्रश्नाचे उत्तर देताना वसीम हसत म्हणाले, “मी मागील 10 वर्षापासून कपडे धूत आहे. आता मी 56 वर्षाचा आहे. तर मी म्हणू शकतो कपडे साफ होत आहेत. एरियल, एरियल.”
जेव्हा हा संवाद होत होता तोपर्यंत सगळे ठिक होते, मात्र वसीम यांच्या उत्तरानंतर अँकरने त्यांना पाकिस्तानचा नॅशनल धोबी म्हटले. याला वसीम यांनी मस्करीत घेतले आणि म्हटले, “नॅशनल भाभी ऐकले होते परंतु नॅशनल धोबी पहिल्यांदाच ऐकत आहे.”
I love this show 😂😂😂😂 pic.twitter.com/0fky3FYheW
— Ghumman (@emclub77) November 6, 2022
पाकिस्तानने 1992 नंतर दोनदाच आयसीसीच्या स्पर्धा जिंकल्या. त्यामध्ये 2009चा टी20 विश्वचषक आणि 2017ची चॅम्पियन्स ट्रॉफी यांचा समावेश आहे. आठव्या टी20 विश्वचषकात ते उपांत्य फेरीत जरी पोहोचले असले तरी कर्णधार बाबर आझम याच्या कामगिरीवर पाकिस्तानच्या दिग्गजांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटची एडिलेडमधील आकडेवारी इंग्लंडसाठी चिंतेचा विषय, टी-20 सामना खेळताना एकदाही नाही झाला बाद
‘असं’ झालं, तर भारत- न्यूझीलंड संघात रंगणार टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना, आयसीसीचा नियम घ्या जाणून