पाकिस्तान क्रिकेट संघाला दुस-या शब्दात फेरबदलाचे संघ असेही म्हणता येईल. जेथे नेहमीच काहीतरी विचित्र घडत असते. अलीकडेच बाबर आझमने वनडे आणि टी20 च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान आता पाकिस्तानी खेळाडूंना गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळालेला नसल्याचा दावा करण्यात येत आहे.
एककडे खेळाडूंना चार महिने झाले पगार मिळत नाहीये, दुसरीकडे, त्याला केंद्रीय करार गमावण्याचा धोकाही आहे. फिटनेस चाचणीत अपयशी ठरलेल्या खेळाडूंना केंद्रीय करार मिळणार नाही. असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहिसन नक्वी यांनी सांगितले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानी खेळाडूंना अद्याप केंद्रीय करार मिळालेला नाही. करार मिळण्यास उशीर झाल्याबद्दल पाकिस्तानी क्रिकेटपटू अजिबात खूश दिसत नाहीत. ‘क्रिकेट पाकिस्तान’च्या वृत्तानुसार, सेंट्रल काॅन्ट्राक्टच्या अनिश्चिततेबाबत खेळाडू बोर्डाकडून खूप निराश आहेत. 2023 मध्ये 2026 साठी केंद्रीय करार करण्यात आला.
अहवालात पाकिस्तानी खेळाडूंना गेल्या चार महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकातील पाकिस्तानच्या कामगिरीमुळे पीसीबीला पुन्हा एकदा कराराचे पुनरावलोकन करण्यास भाग पाडले आहे.
एकदिवसीय विश्वचषक 2023 पासून पाकिस्तान संघ खराब फॉर्ममधून जात आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत संघाला उपांत्य फेरीत स्थान निश्चित करता आले नाही. त्यानंतर 2024 टी-20 विश्वचषकातही संघाची अवस्था वाईट झाली. टी-20 विश्वचषकात पाकिस्तानला सुपर-8मध्येही पोहोचता आले नाही. अमेरिका आणि भारताकडून पराभूत झाल्यानंतर हा संघ ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला. अलीकडेच बांग्लादेशने पाकिस्तान संघाचा घरच्या कसोटी मालिकेत 2-0 असा पराभव केला होता.
हेही वाचा-
रोहित-कोहलीला बांग्लादेशी स्टारकडून मिळाली खास भेट, विराट म्हणाला ‘खूब भलो आची’
’11 षटकार, 9 चौकार’, न्यूझीलंडच्या दिग्गजाची वादळी शतकी खेळी, संघाचा दणदणीत विजय
महिला टी-20 वर्ल्ड कपला आजपासून सुरुवात; मॅच टाइमिंग, लाइव्ह स्ट्रिमिंगपासून सर्वकाही जाणून घ्या