बुधवारपासून (दि. 30 ऑगस्ट) पाकिस्तान विरुद्ध नेपाळ संघातील सामन्याने आशिया चषक 2023 स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी आठवडाभरापूर्वीच भारतीय संघ घोषित झाला आहे. अनेक क्रिकेटपटूंनी युझवेंद्र चहल याला संघात न घेण्याविषयी नाराजी व्यक्त केली. मात्र, एक पाकिस्तानी क्रिकेटपटू अशा खेळाडूला सामील न केल्यामुळे नाराज आहे, ज्याने आजपर्यंत एकही वनडे सामना खेळला नाहीये. याव्यतिरिक्त त्याने पाकिस्तान संघ भारतापेक्षा चांगला असल्याचेही म्हटले आहे.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश केनरिया (Danish Kaneria) याने माध्यमांशी बोलताना म्हटले, “यशस्वी जयसवाल एक दिग्गज फलंदाज आहे. ज्याने कसोटीत धमाल केली होती. टी20तही तो चांगला खेळला. एक असा खेळाडू, जो फॉर्ममध्ये आहे, ज्याची बॅट चांगल्याप्रकारे तळपते. त्याला तुम्ही आपल्या संघातून बाहेर केले. संजू सॅमसनला खूप संधी दिली, पण तो त्याचा फायदा घेऊ शकला नाही. मात्र, तरीही तुम्ही त्याला सामन्यात खेळवत होता. तुम्ही संजू, यशस्वी जयसवालला बाहेर केले आणि केएल राहुल, श्रेयस अय्यरला संघात घेतले, जे सरावातही नाहीयेत.”
पुढे बोलताना कनेरिया म्हणाला की, “भारत-पाकिस्तानमध्ये एक चांगला सामना होईल. पाकिस्तान संघ भारताच्या तुलनेत खूप चांगला दिसत आहे. भारताचे प्रदर्शन बादफेरीतील चांगले नाहीये. पाकिस्तानकडे चांगले फलंदाज आहेत. बाबर आझम चांगल्या फॉर्ममध्ये आहे. बुमराह, राहुल, श्रेयस हे सर्व दुखापतीनंतर येत आहेत. कोहली, रोहितची तर सातत्यता तेवढी चांगली नाहीये. पाकिस्तान भारतावर भारी पडेल.”
भारत-पाकिस्तान सामना
भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघ आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत 2 सप्टेंबर रोजी आमने-सामने येत आहे. हा सामना श्रीलंकेच्या कँडी येथे खेळला जाईल. सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता खेळला जाईल. स्पर्धेसाठी दोन्ही संघांची घोषणा झाली आहे. भारताचे नेतृत्वा रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या खांद्यावर आहे, तर बाबर आझम (Babar Azam) पाकिस्तानचे नेतृत्व करणार आहे. (pakistani cricketer said yashasvi jasiwal deserve chance in asia cup 2023 pakistan squad is better rohit sharma virat kohi is not consistent)
हेही वाचलंच पाहिजे-
केएल राहुलबद्दल धक्कादायक ब्रेकिंग! कोच द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, ‘Asia Cup 2023मधील…’
ना राशिद, ना बोल्ट, विश्वचषकात ‘हा’ गोलंदाज घेणार सर्वाधिक विकेट्स; विंडीजच्या दिग्गजाने केलीय भविष्यवाणी