भारत देशाच्या स्वातंत्र्याला मंगळवारी (15 ऑगस्ट 2023) 76 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या धूमधामीत साजरा होत आहे. या खास दिनी प्रत्येक घरात, रस्त्याच्या बाजूला, ऐतिहासिक वास्तूंवर, इत्यादी ठिकाणी भारताचा तिरंगा फडकताना दिसत आहे. प्रत्येक भारतीयाला गहिवरून आणेल अशा या स्वातंत्र्यदिनी भारतवासी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे देशप्रेम व्यक्त करताना दिसतात. याच्या एक दिवस आधी अर्थात 14 ऑगस्टला पाकिस्तानचाही स्वातंत्र्य दिन साजरा झाला.
भारत आणि पाकिस्तान हे दोन शेजारी राष्ट्रे आहेत, मात्र, या दोन्ही देशांमध्ये एकमेकांप्रती विविध गोष्टींमध्ये विरोध पाहायला मिळतो. क्रिकेटमध्येही हे दोन्ही संघ आमनेसामने असताना कमालीची उत्सुकता निर्माण होते. दोन्ही देशांमध्ये क्रिकेट लोकप्रिय खेळ आहे आणि चाहतेदेखील मोठ्या प्रमाणात आहेत. दोन्ही देशांमध्ये तणाव असली तरी, पाकिस्तानचे असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी भारतीय महिलांसोबत लग्न गेले आहे. या खेळाडूंच्या पत्नी अनेकदा सर्वाचे लक्ष केंद्रित करतात. चला तर पाहूया पाकिस्तानचे काही क्रिकेटपटू ज्यांनी भारतीय महिलांसोबत लग्न केले आहे.
1. शोएब मलिक-
या यादीमध्ये सर्वात महत्वाचे आणि लोकप्रिय नाव येते ते म्हणजे पाकिस्तानचा दिग्गज अष्टपैलू शोएब मलिक आणि भारतीय टेनिस खेळाडू सानिया मिर्झा यांचे. या दोघांनी 2010 मध्ये लग्न केले आहे. या दोघांना इजहान नावाचा एक मुलगाही आहे. हे दोघेही त्यांच्या क्षेत्रात सध्या उत्कृष्ट प्रदर्शन करत आहेत.
2. हसन अली-
पाकिस्तानच्या हसन अलीने 20 ऑगस्ट 2019 मध्ये हरियाणाच्या नूंह जिल्ह्यात राहणारी शामिया आरजूसोबत लग्न केले. शामिया एक एरोनॉटिकल एंजीनियर आहे. या दोघांचे लग्न दुबईमध्ये झाले होते, ज्यामध्ये फक्त जवळच्या व्यक्ती आणि मित्रांना आमंत्रित केले गेले होते. हसन अलीच्या म्हणण्याप्रमाणे शामियासोबत त्याची पहिली भेट एका जेवणाच्या कार्यक्रमात झाली होती.
नूंह जिल्ह्याची रहिवासी असलेल्या शामियाचे वडील लियाकत अली बीडीपीओच्या पदावरून निवृत्त झाले आहेत. लियाकत यांचे वडील आणि पाकिस्तानचे माजी संसद सदस्य तसेच पाकिस्तान रेल्वे बोर्डाचे चेअरमन सरदार तुफैल हे सख्ये भाऊ होते. भारत – पाकिस्तान फाळणीच्या वेळी तुफैल पाकिस्तानमध्ये गेले आणि शामियाचे कुटुंब भारतात आले. याच पार्श्वभूमीवर शामिया आणि हसन अली यांचा विवाह ठरवण्याता आला होता.
३. जहीर अब्बास-
जहीर अब्बास यांनी 1988 मध्ये रिता लुथरा यांच्याशी लग्न केले होते. लग्नानंतर रिता लुथरा यांनी धर्मांतरण केले होते आणि त्यांचे नाव समीना अब्बास असे झाले होते. दोघेही सध्या पाकिस्तानच्या कराचीमध्ये राहतात. समीना सध्या त्यांचा एंटिरियार डिझायनिंगचा व्यवसाय पाहतात. जहीर अब्बास यांना पाकिस्तानचे दिग्गज फलंदाज मानले जाते.
४. मोहसिन खान-
मोहसिन खान यांनी 1980च्या दशकात रिना रॉय यांच्यासोबत लग्न केले होते आणि त्यानंतर ते मुंबईमध्ये स्थायिक झाले होते. या दोघांना एक मुलगी आहे आणि तिचे नाव जन्नत आहे. असे असले तरी, या दोघांतीन वैवाहिक संबंध जास्त काळ टीकू शकले नाहीत. १९९० च्या सुरुवातीलाला या दोघांमध्ये घटस्पोट झाला होता.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
एका सुवर्ण युगाचा अंत! ‘बिग बुल’च्या निधनाने हळहळले भारतीय दिग्गज
झिम्बाब्वे दौरा जिंकण्यासाठी राहुलकडे आहेत ‘हे’ ३ हुकमी एक्के! कोणत्याही क्षणी निकाल बदलण्यात पटाईत
बाबो.. बॅट आहे की धावा काढायची मशीन! इंग्लंडचा क्रिकेटर जबरदस्त फॉर्मात, शतकांची केलीय हॅट्रिक





