---Advertisement---

शेपूट वाकडच! पाकिस्तानी चाहत्यांनी न्यूझीलंडच्या खेळाडूंना डिवचले; पाहा व्हिडिओ

On: बुधवार, ऑक्टोबर 27, 2021 9:48 AM
---Advertisement---

शारजाच्या मैदानावर मंगळवारी (२६ ऑक्टोबर) पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. या लढतीत पाकिस्तान संघाने बाजी मारत ५ गडी राखून विजय मिळवत या स्पर्धेतील सलग दुसरा विजय आपल्या नावे केला. पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय संघावर १० गडी राखून विजय मिळवला होता. आता न्यूझीलंड संघाला पराभूत करून पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी प्रबळ दावेदार बनला आहे. दरम्यान हा सामना सुरू असताना पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी न्यूझीलंडच्या खेळाडूंना चिडवायला सुरुवात केली होती. काय आहे प्रकरण? चला जाणून घेऊया.

या सामन्यात पाकिस्तान संघाला विजयासाठी १३५ धावांची आवश्यकता होती.ज्यावेळी पाकिस्तान संघाची फलंदाजी सुरू होती. त्यावेळी पाकिस्तान संघाचे समर्थक खेळाडूंना चियर करण्यात कुठेच कमी पडले नाही. त्यांनी आपल्या खेळाडूंना तर चियर केले. यासह न्यूझीलंड संघातील खेळाडूंना देखील चिडवायला सुरुवात केली होती. पाकिस्तानी समर्थक न्यूझीलंडच्या खेळाडूंना पाहून “सेक्युरीटी.. सेक्युरीटी..” असे चिडवत होते. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण?

टी -२० विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी न्यूझीलंड संघाला पाकिस्तान संघाचा दौरा करायचा होता. या दौऱ्यावर या दोन्ही संघांमध्ये वनडे आणि टी२० मालिका पार पडणार होती. परंतु पहिला वनडे सामना सुरू होण्याच्या काही तासांपूर्वीच न्यूझीलंड संघाने हा दौरा रद्द केला. त्यावेळी न्यूझीलंड संघाने सुरक्षेच्या कारणास्तव माघार मालिका रद्द करत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे न्यूझीलंड संघ एकही सामना न खेळता माघारी परतला होता. न्यूझीलंड संघाचे हे वागणे कोणालाच आवडले नव्हते. ज्यामुळे पाकिस्तान संघांच्या समर्थकांनी न्यूझीलंडच्या खेळाडूंना लाईव्ह सामन्यात “सेक्युरीटी.. सेक्युरीटी..” असे चिडवायला सुरुवात केली होती.

पाकिस्तान संघाने मिळवला ५ गडी राखून विजय

या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर न्यूझीलंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना डॅरिल मिशेलने २७ आणि डेवोन कॉनवेने देखील २७ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला २० षटक अखेर ८ बाद १३४ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक ३३ आणि आसिफ अलीने नाबाद २७ आणि शोएब मलिकने नाबाद २६ धावांची खेळी करत पाकिस्तान संघाला हा सामना ५ गडी राखून जिंकून दिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---