टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना गुरुवारी (दि. 10 नोव्हेंबर) भारत विरुद्ध इंग्लंड संघात पार पडला. या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाला 10 विकेट्सने पराभूत करत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले. ऍडलेड येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताच्या पराभवावर शोएब अख्तरची प्रतिक्रिया लक्ष वेधत आहे. त्याने यावेळी भारतीय संघावर चांगलाच निशाणा साधल्याचे दिसते.
सामन्याचा आढावा
टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 168 धावा चोपल्या होत्या. भारताच्या या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघाने चांगली सुरुवात केली. त्यांचे सलामीवीर जोस बटलर (Jos Buttler) आणि ऍलेक्स हेल्स (Alex Hales) या जोडीने विकेट न गमावता खेळपट्टीवर टिकून भारताचे आव्हान 16 षटकात गाठले. तसेच, हा सामना 10 विकेट्सने आपल्या नावावर केला.
यावेळी कर्णधार जोस बटलर याने 49 चेंडूत 80 धावांची खेळी साकारली. यामध्ये 3 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता. तसेच, हेल्सने 47 चेंडूत 4 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 86 धावा चोपल्या.
शोएब अख्तरची प्रतिक्रिया
या सामन्यादरम्यान पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) सातत्याने ट्वीट करत होता. यावरून समजते की, तो संपूर्ण सामन्यादरम्यान त्याच्या टीव्ही शेजारीच बसून होता. इंग्लंडच्या विजयानंतर अख्तरने भारताच्या पराभवावर जोरदार निशाणा साधला.
यामध्ये तो म्हणाला की, “भारतीय संघ खूपच खराब खेळला. त्यांचा पराभव झालाच पाहिजे होता. ते अंतिम सामन्यासाठी पात्र नव्हते. त्यांची निवड गोंधळात टाकणारी आहे.”
170/0
A figure thats going to disturb for times to come. Tough game India.— Shoaib Akhtar (@shoaib100mph) November 10, 2022
यापूर्वी त्याने भारताच्या पहिल्या डावाबद्दल बोलतानाचा व्हिडिओही पोस्ट केला होता. यामध्ये त्याने हार्दिक पंड्या (33 चेंडूत 63 धावा) याची जोरदार प्रशंसा केली. यामध्ये अख्तर म्हणाला होता की, “पाकिस्तान संघ अंतिम सामन्यात भारताची वाट पाहत आहे.”
Embarrassing loss for India. Bowling badly exposed. No meet up in Melbourne unfortunately. pic.twitter.com/HG6ubq1Oi4
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) November 10, 2022
Englands intent from the first ball translated into a crazy run rate .
100 in 10 overs is madness.— Shoaib Akhtar (@shoaib100mph) November 10, 2022
India needs wicketssssss!
Nowwww.— Shoaib Akhtar (@shoaib100mph) November 10, 2022
भारतीय गोलंदाज ठरले फ्लॉप
दुसरीकडे, इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. भारतीय गोलंदाज यावेळी सपशेल फ्लॉप ठरले. अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांसारख्या युवा गोलंदाजांसोबतच भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि आर अश्विन यांचा अनुभवही या सामन्यात अपयशी ठरला.
आता 13 नोव्हेंबर रोजी इंग्लंड संघ पाकिस्तानविरुद्ध मेलबर्नच्या क्रिकेट ग्राऊंडवर अंतिम सामना खेळेल. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Pakistani former cricketer shoaib akhtar on disappointing defeat of india against england in t20 world cup semi final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘लवकरच काही वरिष्ठ खेळाडू रिटायरमेंट घेतील’; भारतीय दिग्गजाचे भाकीत
जोडी जबरदस्त! टीम इंडियाला चोपत बटलर-हेल्सने वर्ल्ड रेकॉर्डही केलाय






