भारताचा पुढचा कर्णधार कोण असू शकतो यावर पाकिस्तानी माजी दिग्गज गोलंदाज वकार युनिस (Waqar Younis) यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. वकारने एका स्पोर्ट्स शोमध्ये मिसबाह उल हक ( Misbah ul haq) यांच्या विधानाला समर्थन करत ‘हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) हा भारताचा पुढचा कर्णधार असू शकतो ‘ असे वक्तव्य केले.
टी20 विश्वचषक 2022 ची सुरुवात भारतीय संघाने धमाकेदार पद्धतीने केली. पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानवर 4 गडी राखून मात केली.या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) याने नाबाद 82 धावांची खेळी केली, तसेच हार्दिकने अष्टपैलू कामगिरी करत दमदार योगदान दिले. यानंतर सर्व क्रिकेट रसिकांनी त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. मात्र, या सामन्यानंतर एका चर्चेत पाकिस्तानचे माजी महान गोलंदाज वसिम अक्रम (Wasim Akram) आणि वकार यूनिस (Waqar Younis) यांनी हार्दिक हंड्या (Hardik Pandya) याला भारतीय संघाचा पुढचा कर्णधार घोषित करून टाकले.
माजी पाकिस्तानी कर्णधार मिसबाह उल हक देखील या चर्चेचा भाग होता, त्यात तो म्हटला की ”हार्दिकला स्वत:वर विश्वास आहे आणि त्याला खेळ चांगला समजतो.आपण जर हार्दिकला पाहिलं तर हार्दिकने कदाचित पहिल्यांदा आयपीएलमध्ये कर्णधारपद भुषवलं आहे आणि ज्या पद्धतीने त्याने संघाच नेतृत्व केलं ते शानदार होतं. त्यांनी आयपीएल ट्रॉफी जिंकली, यावरून समजतं की त्याने दबाव कशा प्रकारे हाताळला असेल. संघात त्याची भुमिका फिनिशरची आहे आणि तुम्ही फिनिशर तेव्हाच असू शकता जेव्हा तुम्ही मानसिकरित्या मजबूत असता आणि एक आत्मविश्वास असतो. त्याला खेळ कसा पुढे घेउन जायचा हे चांगल समजतं.”
यावर वकार मिसबाहला थांबवत म्हणाला की, ”जर हार्दिक पुढचा कर्णधार झाला तर मला आश्चर्य नाही वाटणार.” तसेच अक्रम या अष्टपैलू खेळाडूची स्तुती करत म्हणाला की, ”तो आधी आयपीएलमध्ये कर्णधार झाला. तो जिंकला. आता तो संघात एक मुख्य खेळाडू आहे, तो कर्णधाराला सल्ला देखील देतोय पण तो अजून शिकतोय. त्यामुळे एकदम मोठी जबाबदारी दिली, तर त्याला काहीचं समजणार नाही.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘त्याला जास्त वेळ शांत ठेवणे म्हणजे…’, वाचा विराटविषयी ब्रेट ली काय म्हणाला
विराटची ऑस्ट्रेलियात विक्रमांची माळ! ‘हा’ पराक्रम तुम्हाला नक्कीच माहिती नसणार