शेवटच्या काही वर्षांपासून पाकिस्तान क्रिकेट संघाची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. संघातील एकही खेळाडू विशेष कामगिरी करताना दिसला नाही. तत्पूर्वी पाकिस्तानच्या या कामगिरीदरम्यान माजी दिग्गज खेळाडू वसीम अक्रमनं (Wasim Akram) आपल्या आवडत्या खेळाडूचे नाव सांगितले आहे. विशेष म्हणजे ते खेळाडू पाकिस्तानी नसून भारतीय आहेत. वसीम अक्रमनं सध्या आपला आवडता फलंदाज आणि गोलंदाज निवडला आहे. त्याच्या निवडीबद्दल सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यानं पसंतीच्या यादीत एकाही पाकिस्तानी खेळाडूची निवड केली नाही.
पाकिस्तानचा माजी दिग्गज अष्टपैलू वसीम अक्रमनं (Wasim Akram) अमेरिका क्रिकेटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “जर मला एकाची निवड करावी लागली तर कदाचित देशातील लोक त्याला पसंत करणार नाहीत. माझा आवडता वेगवान गोलंदाज भारताचा आधुनिक काळातील महान गोलंदाज जसप्रीत बुमराह आहे. तो खूप वेगळा आहे आणि त्यानं मला प्रभावित केलं आहे कारण तो क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये दिग्गज गोलंदाज आहे.”
पुढे बोलताना वसीम अक्रम (Wasim Akram) म्हणाला, “फलंदाज म्हणून व्हिव्हियन रिचर्ड्स हा आतापर्यंतचा महान फलंदाज आहे, पण जर मला निवडायचे असेल तर मी दुसरा भारतीय फलंदाज निवडेन. ज्याचे मला खरोखर कौतुक वाटते. तो विराट कोहली (Virat Kohli आहे. तो केवळ मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरही त्याच्या फिटनेसचे आणि खेळाचे सर्वात मोठे नाव आहे.”
वसीम अक्रमच्या (Wasim Akram) आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर तो पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज होता. त्यानं पाकिस्तानसाठी 104 कसोटी आणि 356 एकदिवसीय सामने खेळले आहेत. 104 कसोटी सामन्यांमध्ये त्यानं 414 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 23.62 राहिली, तर इकाॅनाॅमी 2.59 राहिली. 356 एकदिवसीय सामन्यात त्यानं 502 विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याची इकाॅनाॅमी 3.89 आणि सरासरी 23.52 आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जुन्नरमधील शिवनेरी ट्रेकर्स ची कामगिरी, स्वातंत्र्यदिनी फडकला ‘कांगयात्से’वर तिरंगा
दिनेश कार्तिकने निवडले टीम इंडियाची ऑलटाइम प्लेइंग इलेव्हन, संघातील विश्वासूलाच ठेवले बाहेर
बांग्लादेशमध्ये क्रिकेटमध्ये सत्तापालट होणार! बोर्डाचे अध्यक्ष पायउतार होण्याच्या तयारीत