आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात अनेक असे नवीन रेकाॅर्ड बनले आहेत, तर अनेक जुने रेकाॅर्ड तुटले गेले आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या इतिहासात अशी एकही गोष्ट अशक्य नाही. तत्पूर्वी जगात असा एक गोलंदाज आहे, ज्याने आपल्या 21 वर्षांच्या संपूर्ण कसोटी क्रिकेट कारकीर्दीत एकही नो-बॉल टाकला नाही. गोलंदाज अनेकदा नो बॉल टाकण्याची चूक करतात, ज्यामुळे त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण संघाला अनेक वेळा पराभवाचा सामना करावा लागतो.
पाकिस्तान संघाचा एक असा गोलंदाज आहे, ज्याने आपल्या 21 वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत एकही नो-बॉल टाकला नाही. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार इम्रान खाननं (Imran Khan) आपल्या संपूर्ण 21 वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत एकही नो बॉल टाकला नाही. इम्रान खानच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्स घेण्याचा रेकाॅर्ड आहे आणि यादरम्यान त्याने कधीही नो-बॉल टाकला नाही. इम्रानने त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला 1992चा विश्वचषक जिंकून दिला होता.
इम्रान खानच्या (Imran Khan) आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने पाकिस्तानसाठी 88 कसोटी आणि 175 एकदिवसीय सामने खेळले आहेत. 88 कसोटी सामन्यात 37.69च्या सरासरीने त्याने 3,807 धावा केल्या आहेत, तर सोबतच 362 विकेट्स घेतल्या आहेत. 175 एकदिवसीय सामन्यात इम्रानने 33.41च्या सरासरीने 3,709 धावा केल्या आहेत, तर 182 विकेट्स देखील घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
एकेकाळी संघाचा घातक गोलंदाज,आता खाजगी कंपनीत नोकर; स्टार क्रिकेटपटूची व्यथा
‘बेझबॉल’ फक्त नावालाच! टीम इंडियाच्या ‘सिक्स हिटिंग’समोर इतर सर्व संघ फेल
‘दीड तास फ्लाइट लेट, नंतर तुटलेली सीट’, एअर इंडियावर स्टार क्रिकेटपटू संतापला