---Advertisement---

तिसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तानचा 111 धावांनी मोठा विजय; ऑस्ट्रेलियाला 3-0 ने चारली धूळ

On: रविवार, फेब्रुवारी 1, 2026 10:19 PM
---Advertisement---

लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा 111 धावांनी धुव्वा उडवला (AUS vs PAK). या मोठ्या विजयासह पाकिस्तानने मालिका 3-0 अशी खिशात घातली.

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 6 बाद 207 धावा केल्या. सॅम अयुब (56) आणि बाबर आझम (नाबाद 50) यांनी अर्धशतके झळकावली, तर शादाब खानने 19 चेंडूत 46 धावांची आतषबाजी केली. 208 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ पूर्णपणे ढेपाळला. कर्णधार मिचेल मार्शसह (Mitchell marsh) 7 फलंदाज दुहेरी धावसंख्याही गाठू शकले नाहीत. संपूर्ण संघ 16.5 षटकांत अवघ्या 96 धावांवर गारद झाला.

पाकिस्तानच्या विजयात फिरकीपटू मोहम्मद नवाझ चमकला. त्याने 18 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---