पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये शाहनवाज दहानीने सारा टेलर आणि त्याच्या लग्नाच्या प्रपोजलच्या अफवांवर उत्तर दिले आहे.
इंग्लंड महिला संघाची माजी कर्णधार सारा टेलर हिला पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानीसोबत लग्न करायची इच्छा असल्याची अफवा पसरली होती. सोशल मीडियावर यासंदर्भात मोठ्या प्रमाणात अफवा पसरल्या होत्या. यावर आता दहानीने एक गमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे.
दहानी या व्हिडिओमध्ये म्हणाला आहे की, ‘जर साराने मला लग्नासाठी विचारले तर माझे उत्तर हो असेल. हे संपूर्ण जग आशेवर जिवंत आहे.’ या अफवावर सारा टेलरने अजून काहीच प्रतिक्रिया दिली नाही. अशा परिस्थितीत चाहत्यांना आता सारा टेलर काय उत्तर देईल? याची उत्सुकता आहे.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानीने पाकिस्तान सुपर लीगच्या शेवटच्या हंगामात उत्तम कामगिरी करून मैदान गाजवले होते. दहानी हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज असून त्याने मुल्तान सुलतान संघाला किताब जिंकण्यास मदत केली होती. या व्यतिरिक्त तो या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज देखील ठरला होता. त्याने या हंगामात ११ सामन्यांत २० बळी घेतले होते.
https://www.facebook.com/watch/?v=830857290896436
गोलंदाज शाहनवाज दहानीला यावर्षी पाकिस्तान संघात स्थान मिळाले आहे. मार्च २०२१ मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी दहानीला पाकिस्तानच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले. जून २०२१ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी त्याला पाकिस्तानच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले होते. परंतु अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी न मिळाल्याने तो अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पण करू शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
मास्टरमाईंड! अन् द्रविडने ड्रेसिंग रूममधून बाहेर येत पाठवला खास संदेश, पण काय होतं त्या चिठ्ठीत?
आम्ही अपयशी ठरलो, पण मला माझ्या शिलेदारांचा अभिमान आहे, त्यांना माझा सलाम- कर्णधार धवन
‘खेळाडूंना बाकावर बसवण्यासाठी किंवा सुट्ट्यांसाठी निवडलं जात नाही’, प्रशिक्षक द्रविडचे वक्तव्य