क्रिकेटविश्वात अनेक उत्कृष्ट फलंदाज आहेत, ज्यांनी आपल्या दमदार शैलीने मैदान गाजवले आहे. प्रत्येक फलंदाजाचा एक वेगळा शॉट असतो, त्या खेळाडूला त्याच्या त्या अद्भुत शॉटमुळेही वेगळी ओळख मिळते. दिग्गज भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्या स्ट्रेट ड्राईव्ह शॉटला तोड नाही. त्याचप्रमाणे विराट कोहलीचीही कव्हर ड्राईव्हही बघण्यासारखी असते. अगदी कव्हर ड्राईव्ह त्याची मोठी ओळख बनली आहे, असे म्हणणेही वावगे ठरणार नाही. याचबद्दल जेव्हा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमला विचारले, तेव्हा त्याने काही वेगळेच उत्तर दिले.
बाबर आजमचे मत
पाकिस्तानचा युवा खेळाडू आणि पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजमला कोहलीचा कव्हर ड्राईव्ह नाही आवडत नाही. परंतु कोहली एक फलंदाज म्हणून बाबर आजमला आवडतो. मागील काही दिवसांपासून आजम आणि कोहली यांची तुलना केली जात आहे. आजमची तुलना जेव्हा भारतीय संघाचा कर्णधार कोहलीसोबत होते तेव्हा त्याला खूप अभिमान वाटतो. परंतु त्याला कोहलीचा विशेष कव्हर ड्राईव्ह नाही आवडत, तर ईयान बेल आणि केन विलियम्सन यांचा कव्हर ड्राईव्ह खूप आवडतो.
कव्हर ड्राईव्हमध्ये हे खेळाडू आहेत मास्टर
याविषयी बोलताना आजम म्हणाला, “केन विलियम्सन आणि ईयान बेल यांचा कव्हर ड्राईव्ह शॉट मला आवडतो. ईयान बेल याचा कव्हर ड्राईव्ह खूप स्पष्ट असतो. जणूकाही तो स्लो मोशनमध्ये खेळत आहे. केन विलियम्सन याचा कव्हर ड्राईव्ह देखील उत्कृष्ट आहे. परंतु तो कव्हर ड्राईव्ह थोडा उशीरा खेळतो आणि चेंडू शरीराजवळ येऊ देतो.”
आजम पुढे म्हणाला की, “माझा कव्हर ड्राईव्ह नैसर्गिक आहे. मी माझ्या कव्हर ड्राईव्हवर खूप मेहनत घेतली आहे. काही लोकांनी तर मला माझ्या पदार्पणाच्या सुरुवातीला हा शॉट न खेळण्याचा सल्ला दिला होता. पण मी यावर खूप मेहनत घेतली आहेत. टी20 सामन्यात हा शॉट खेळायला जास्त वेळ नसतो. पण तेच एकदिवशीय सामन्यात आणि कसोटी सामन्यात मी हा शॉट पूर्ण वेळ घेऊन खेळतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये सिराजची जागा पक्की, ३०३ विकेट्स घेणारा गोलंदाज बसणार बाकावर?
मॅच फिक्सिंगमुळे १० वर्षांसाठी निलंबित झालेला ‘हा’ क्रिकेटपटू आता बनणार मॅच रेफरी!
झारखंडचा ‘हा’ खेळाडू सापडलाय आर्थिक संकटात, शेती करून भरतोय पोट






