इंग्लंड पुरूष क्रिकेट संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. इंग्लंड तब्बल 17 वर्षानंतर पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील पहिला सामना (1 ते 5 डिसेंबर) रावळपिंडी स्टेडियमध्ये खेळला जात आहे. यामध्ये इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
कसोटीच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक धावा
यावेळी इंग्लंडच्या पहिल्या तीन फलंदाजांनी शतकी आणि एका खेळाडूने दिडशतकी खेळी केल्याने इंग्लंडने पहिल्या दिवशी 4 विकेट्स गमावत 506 धावसंख्या उभारली होती. कसोटीमध्ये पहिल्या दिवशी 500 धावांचा टप्पा पार करण्याचा विक्रम इंग्लंडने आपल्या नावावर केला. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. त्यांनी 1910मध्ये सिडनी कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या दिवशी 494 धावासंख्या उभारली होती.
ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच 2012मध्ये ऍडलेडवर 86.5 षटकात 5 विकेट्स गमावत 482 धावसंख्या उभारली होती. तेव्हा त्यांचा रनरेट 5.57 राहिला. आता इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध पहिल्या दिवशी 6.75च्या रनरेटने धावा काढल्या.
A day England batters will remember for a long time 🤩
The records that tumbled 👉 https://t.co/Vg3wfbldSb#WTC23 | #PAKvENG pic.twitter.com/9NGD4LDyMP
— ICC (@ICC) December 1, 2022
पहिल्या दिवशीच चार कसोटी शतके
सलामीवीर झॅक क्राऊले (Zak Crawley) आणि बेन डकेट (Ben Duckett) यांनी शतकी खेळी केल्यानंतर, हॅरी ब्रुक आणि ओली पोप यांनीही त्यांचे शतक पूर्ण केले. कसोटीच्या इतिहासात पहिल्यांदाच पहिल्या दिवशी चार खेळाडूंनी शतकी खेळी करण्याची कामगिरी केली आहे. या चारही खेळाडूंचा स्ट्राईक रेट 100च्या वर राहिला.
कसोटीमध्ये विक्रमी सलामी भागीदारी-
क्राऊले आणि डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी 35.4 षटकात 233 धावांची भागीदारी केली. जी कसोटी इतिहासातील सर्वोच्च सलामीची भागीदारी ठरली. या धावा त्यांनी 6.53च्या रनरेटने काढल्या. त्यांच्या आधी जोई बर्न्स आणि डेविड वॉर्नर यांनी 2015मध्ये न्यूझीलंड विरुद्ध 6.29च्या रनरेटने धावा केल्या होत्या.
4⃣4⃣4⃣4⃣4⃣4⃣ 😯
24 runs in an over for Harry Brook 🔥#WTC23 | #PAKvENG | https://t.co/PRCGXi3dZS pic.twitter.com/iF5jmAUWeV
— ICC (@ICC) December 1, 2022
एका षटकात 6 चौकार
ब्रुकने नवखा खेळाडू सौद शकील याच्या एका षटकात 6 चौकार मारले. कसोटी इतिहासात पाचव्यांदा असे घडले आहे. याआधीच अशा कामगिरी संदीप पाटीलने विरुद्ध बॉब विलिस (1982), क्रिस गेल विरुद्ध मॅथ्यू होगार्ड (2004), रामनेश सारवान विरुद्ध मुनाफ पटेल (2006) आणि सनथ जयसूर्या विरुद्ध जेम्स ऍंडरसन (2007) यांनी केल्या आहेत. PAKvENG: ‘World Record’ Rawalpindi Test, England batsmen shattered records first day
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्पर्धा भारताची दबदबा विदेशी खेळाडूंचा! बेस प्राईजची रक्कम वाचून बसेल धक्का
ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर