आजच्या दिवसाची तिसरी लढत पालघर काझीरंगा रहिनोस विरुद्ध परभणी पांचाला प्राईड यांच्यात झाली. सामना सुरुवाती पासून चुरशीचा झाला. पालघर कडून पियुष पाटील तर परभणी कडून प्रसाद रुद्राक्ष ने आक्रमक खेळ केला. पियुष पाटील च्या अष्टपैलू खेळाने पालघर संघाने परभणी संघावर लोन पडत आघाडी मिळवली.
मध्यांतराला पालघर संघाकडे 20-15 अशी आघाडी मिळवली. पियुष पाटील ने अष्टपैलू खेळ केला तर राहुल सवर ने चढाईत जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले. तर परभणी कडून प्रसाद रुद्राक्ष ने चांगला खेळ केला.
मध्यांतरा नंतरही पालघर संघाच्या चढाईपटूंनी आक्रमक खेळ सुरू ठेवत संघाला विजय मिळवुन दिला. पालघर कडून पियुष पाटील ने चढाईत 6 तर पकडीत 2 गुण मिळवत अष्टपैलू खेळ केला. तर राज साळुंखे व राहुल सवर यांनी चढाईत महत्वपूर्ण भूमिका निभावली. हर्ष मेहेर व अभिनय सिंग यांनी उत्कृष्ट पकडी केल्या. परभणीच्या प्रसाद रुद्राक्ष च्या आक्रमक चढाया आणि राहुल घांडगे च्या अष्टपैलू खेळीने सामन्यात चुरस निर्माण केली. मात्र अखेरच्या क्षणी पालघर संघाने 34-33 असा सामना जिंकला. (Palghar Kaziranga Rhinos won the match)
बेस्ट रेडर- प्रसाद रुद्राक्ष, परभणी पांचाला प्राईड
बेस्ट डिफेंडर्स- हर्ष मेहेर, पालघर काझीरंगा रहिनोस
कबड्डी का कमाल- राहुल सवर, पालघर काझीरंगा रहिनोस
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विजयी मार्गावर परतण्यासाठी पंजाब-गुजरात सज्ज! नाणेफेक जिंकत हार्दिकचा गोलंदाजीचा निर्णय
रेलीगेशन फेरीत रायगड मराठा मार्वेल्स संघाची विजयी सुरुवात