---Advertisement---

‘पंत आणि पेन, कोहलीला हवाय बेबी सिटर’, भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीदरम्यान झळकले पोस्टर

On: शनिवार, डिसेंबर 26, 2020 4:01 PM
---Advertisement---

क्रिकेट सामन्यांमध्ये अनेकदा चाहते वेगवेगळ्या आणि अनोख्या गोष्टी करताना दिसतात. कधी ते चेहऱ्यावर काही चित्र काढतात, तर काही जर मास्क लावतात. कोहीजणं काहीतरी संदेश लिहिलेला पोस्टर घेऊन येतात. असेच शनिवारपासून सुरु झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत बॉक्सिंग डे कसोटी सामन्यादरम्यानही अनोखे पोस्टर झळकले.

पेन-पंतला खास संदेश –

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात (बॉक्सिंग डे कसोटीत) एक चाहता अनोखे पोस्टर घेऊन स्टँडमध्ये बसला होता. या पोस्टरवर त्याने भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन यांच्यासाठी एक खास संदेश लिहिला होता.

त्याने लिहिले होते की ‘पेन आणि पंत, कोहलीला हवाय बेबी सिटर’. या पोस्टरचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

https://twitter.com/FoxCricket/status/1342685274891976709

या चाहत्यांने पंत आणि पेनसाठी असा संदेश लिहिण्यामागचे नक्की कारण काय? 

या चाहत्याने असा अजब संदेश लिहिण्यामागे भारताच्या २०१८-१९ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा संबंध आहे. हा संबंध असा की मागच्यावेळी जेव्हा भारताने ऑस्ट्रेलिया दौरा केला होता, तेव्हा पंत आणि पेनमध्ये मजेदार शाब्दिक युद्ध रंगले होते. त्यांच्या या शाब्दिक चकमकीचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते.

त्यावेळी मेलबर्न कसोटीत पहिल्यांदा पेन पंतला स्लेज करताना म्हणाला होता की ‘एमएस धोनी वनडे संघात परत आला आहे. त्यामुळे तू बीबीएलमध्ये हॅरिकेन संघात खेळू शकतो. त्यांना फलंदाजाची गरज आहे.’

‘तूझा ऑस्ट्रेलियातील सुट्टीचा वेळही वाढेल. होबार्ट हे सुंदर शहर आहे. तुला शानदार आपार्टमेंटही मिळेल.’ तसेच तो पुढे म्हणाला, ‘तू माझ्या मुलांना सांभाळू शकतो का, जेणेकरुन मी माझ्या पत्नीला घेऊन चित्रपट पहायला जाऊ शकतो.’

https://twitter.com/cricketcomau/status/1078545482597556224

त्यानंतर पेनने केलेल्या स्लेजचा हिशोब चुकता करतना पंत यष्टीमागून पेनला डिवचताना दिसला. “कमऑन बाॅईज, आपल्याकडे एक खास पाहुणा आला आहे. तो काही करत नाही. मयांक तुला तात्काळ कर्णधार (टेंपररी कॅप्टन) माहीत आहे का?  पेनची ही खास उपस्थिती आहे. त्याला विशेष काही करता येत नाही. तो फक्त बडबड करतो. ” असे यावेळी पंत म्हणताना दिसला होता.

याच शाब्दिक युद्धाचा संदर्भ घेत त्या चाहत्याने पेन आणि पंतसाठी संदेश लिहिला की विराट कोहलीला बेबीसिटर हवा आहे. कारण विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा त्यांच्या पहिल्या बाळाला पुढीवर्षी जानेवारीमध्ये जन्म देणार आहे.

https://twitter.com/cricketcomau/status/1078870798318759936

पेन आणि पंत यांच्यात २ वर्षांपूर्वी रंगलेले शाब्दिक युद्ध सामन्यापुरतेच मर्यादीत होते, हे सामन्यानंतर दोन्ही खेळाडूंनी दाखवून दिले होते. पंतने पेनच्या मुलांबरोबर आणि पत्नीबरोबर फोटो देखील काढला होता.

https://twitter.com/ICC/status/1080013501974831104

मात्र त्यांच्या या संवादाचे पडसाद सोशल मीडियावर चांगलेच उमटले. सध्या सुरु असलेल्या कसोटी सामन्यादरम्यानही सोशल मीडियावर या दोघांवर मीम्स व्हायरल होत आहे. एका ऑस्ट्रेलियन अँकरने तर ट्विट केले आहे की ‘ऑस्ट्रेलियाने सर्व स्टंप माईकवर ऐकू येणारा संवाद प्रसारित करावा. मला बेबी सिटर आणि टेंपररी कॅप्टनचे संवाद ऐकायचे आहेत.’

https://twitter.com/ChloeAmandaB/status/1342683480698748929

https://twitter.com/OffficialGaurav/status/1342684834624229376

https://twitter.com/vikrantdhmn/status/1342703848125657089

https://twitter.com/RapChik_Sapien/status/1342693833218301952

शनिवारी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर संपुष्टात आला आहे. तर भारताने पहिल्या दिवसाखेर १ बाद ३६ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

अर्जुनला मुंबई संघात घेणार की नाही? पाहा कशी केलीय सराव सामन्यात कामगिरी

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी दिल्लीच्या संघाची धुरा ‘गब्बर’वर; भारताच्या ‘हा’ प्रमुख वेगवान गोलंदाजही करणार पुनरागमन

मिचेल स्टार्क ऑन फायर! पहिल्याच षटकात काढली भारतीय फलंदाजाची विकेट, व्हिडिओ व्हायरल 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---