---Advertisement---

Video: चेन्नईला पराभूत केल्यानंतरही पंतने जिंकली धोनीच्या चाहत्यांची मने, ‘हे’ आहे कारण

On: रविवार, एप्रिल 11, 2021 7:23 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ मधील दुसऱ्या सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. य चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्वचे नेतृत्व एमएस धोनी तर दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व युवा रिषभ पंत करत होता. गुरू-शिष्याच्या या लढाईमध्ये अखेरीस बाजी शिष्य पंतच्या हाती लागली. दिल्लीने विजय साजरा केला असला तरी, कर्णधार पंतने धोनीचे गुणगान गायले. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सात गड्यांनी विजय मिळवून स्पर्धेची विजयी सुरुवात केली.

पंतने केले धोनीचे कौतुक
कर्णधार म्हणून आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या रिषभ पंतने विजय मिळवल्यानंतर धोनीचेच कौतुक केले. सामन्यानंतरच्या पारितोषिक वितरण समारंभात हर्षा भोगले यांनी त्याला, “धोनीसोबत नाणेफेकीसाठी येणे हे लहानपणापासूनचे स्वप्न होते का?” असे विचारले.

त्यावर उत्तर देताना पंत म्हणाला, “हा माझ्यासाठी अत्यंत खास क्षण होता. कर्णधार म्हणून पहिला सामना आणि नाणेफेकीसाठी माहीभाईसमोर ही भावनिक वेळ होती. तो माझ्यासाठी गो टू मॅन आहे. मला काहीही अडचण असेल तर मी त्यालाच विचारतो.”

पंतने पहिल्या सामन्यातील विजयाचे श्रेय आपल्या गोलंदाजांना दिले. त्याने सांगितले, “फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी केली. मात्र, आवेश खान व टॉम करन यांनी डावाच्या मध्यात चेन्नईच्या फलंदाजांना रोखून धरण्याचे कार्य पार पाडले. याचमुळे चेन्नईची धावसंख्या २०० पार जाऊ शकली नाही.”

दिल्लीची विजयी सुरुवात
मागील हंगामात निराशाजनक कामगिरी केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सची या हंगामात विजयी सुरुवात झाली नाही. सलामीवीर अपयशी ठरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या सुरेश रैनाने अर्धशतक झळकावले. त्याला मोईन अली, सॅम करन व रवींद्र जडेजा यांनी उपयुक्त खेळ्या करत चांगली साथ दिली. या जोरावर चेन्नईने १८८ धावा धावा धावफलकावर लावल्या.

प्रत्युत्तरात, शिखर धवन व पृथ्वी शॉ यांनी दिल्लीसाठी १३.३ षटकात १३८ धावांची सलामी देत सामना दिल्लीच्या बाजूने झुकविला. धवनने ८५ तर, शॉने ७२ धावांची खेळी केली. कर्णधार रिषभ पंतने नाबाद १५ धावा बनवत संघाला विजय मिळवून दिला.

महत्त्वाच्या बातम्या –

शिखर धवनचा मोठा कारनामा; ‘हा’ रेकॉर्ड करणारा बनला जगातील पहिलाच क्रिकेटर

जेव्हा २५ वर्षांपूर्वी वेंकटेश प्रसाद पाकिस्तानी क्रिकेटरला म्हटला होता ‘मी इंदिरानगरचा गुंडा आहे’, ट्विट होतोय व्हायरल

केकेआर विरुद्ध हैदराबाद: कोण ठरणार वरचढ? पाहा दोन्ही संघांची ‘ही’ आकडेवारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---