सध्या सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये अल्जेरियाची बॉक्सर इमान खेलिफ हिच्या लिंगासंबंधी वाद सुरू आहे. महिलांच्या 66 किलो वजनी गटात खेलिफचा सामना इटालियन बॉक्सर अँजेला कारनिशी झाला हिच्याशी झाला. परंतु, ही लढत 46 सेकंद झाली आणि इमानवर पुरुष असल्याचा आरोप करण्यात आला. संशोधनानुसार, इमानमध्ये पुरूषांत आढळणाऱ्या टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण अधिक असल्याचे समजते. या संपूर्ण प्रकरणामुळे ऑलिंपिक्समध्ये जोरदार वाद सुरू झाला आहे. मात्र, क्रीडाविश्वात अशी अनेक प्रकरणे यापूर्वी देखील समोर आली असून, यामध्ये काही भारतीयांचाही समावेश होता.
दुती चंद: भारतीय धावपटू दुती चंदलाही लिंगवादाचा सामना करावा लागला आहे. टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण जास्त असल्याने तिला 2014 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासही मनाई करण्यात आली होती. पात्रता मिळवूनही तिला या स्पर्धेत सहभागी होता आले नाही. चंदने क्रीडा लवादाच्या न्यायालयात दाद मागितली आणि खटला जिंकला होता.
यानंतर तिने 4 गेममध्ये भाग घेतला, परंतु केवळ 2 गेममध्ये तिला पदक जिंकता आले. डोप चाचणीत अपयशी ठरल्यानंतर चंदवर जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेने (वाडा) बंदी घातली होती. 3 जानेवारी 2023 रोजी तिला 4 वर्षांपर्यंत कोणत्याही खेळात भाग न घेण्याचा आदेश देण्यात आला होता.
शांती सुंदरराजन: भारतीय धावपटू शांती सुंदरराजनही लिंगवादात अडकली होती. 2006 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने 800 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले होते. परंतु, लिंग चाचणीत अपयशी ठरल्याने तिचे पदक हिसकावून घेण्यात आले. यानंतर भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनने तिच्यावर आजीवन बंदी घातली. अशातच तिची क्रीडा कारकीर्द संपली. लिंग चाचणीत शांतीला हायपरअँड्रोजेनिझम असल्याचे आढळून आले. यामुळे महिलांच्या शरीरात अधिक टेस्टोस्टेरॉन तयार होऊ लागते. बंदीच्या 10 वर्षांनी सुंदरराजन हिला नोकरी मिळाली. आज ती तामिळनाडू क्रीडा विकास प्राधिकरणाची प्रशिक्षक आहे.
हेही वाचा –
दीपिका कुमारीचं स्वप्न पुन्हा भंगलं, तिरंदाजीतील भारताचं आव्हान संपुष्टात
लक्ष्य सेनची ‘लक्षवेधी’ कामगिरी, ऑलिम्पिकच्या 128 वर्षांच्या इतिहासात असं करणारा पहिलाच भारतीय!
मोठी बातमी! ऑलिम्पिक दरम्यान भारतीय खेळाडूचा पॅरिसमध्ये कार अपघात, कुटुंबीयही होते सोबत