सध्या भारत आणि वेस्ट इंडिज या दोन संघांमध्ये टी-२० मालिका सुरू आहे. याआधी दोन्ही संघात ३ सामन्यांची वनडे मालिका पार पडली. यात भारताने विंडीजला क्लीन स्विप देत ३-०ने विजय मिळवला. या संपूर्ण मालिकेत भारताची स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार विराट कोहली याला खराब फॉर्ममधून बाहेर पडण्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. जरी विराट या मालिकेत खेळत नसला तरीही सर्वत्र विराटच्या नावाची चर्चा असल्याचे दिसत आहे. अशातच भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल याने विराट कोहली आणि भारतीय संघात होत असलेल्या बदलांवर भाष्य केले आहे.
माजी यष्टिरक्षक पार्थिव पटेलने भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमवारीत होत असलेल्या अनेक बदलांवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. इतके बदल का केले जात आहेत हे आता त्यानी स्पष्ट केले. पार्थिवच्या म्हणण्यानुसार, टीम मॅनेजमेंटला विराट कोहलीला प्लेइंग इलेव्हनमध्ये बसवायचे आहे आणि त्यामुळेच अनेक बदल होत आहेत.
खरंतर विराट कोहली सध्या खूप वाईट फॉर्ममधून जात आहे. प्रत्येक फॉरमॅटमध्ये त्याच्या बॅटमधून धावा येत नाहीत. दुसरीकडे, भारतीय संघ आपल्या फलंदाजीच्या क्रमात सातत्याने बदल करत आहे. रिषभ पंत इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत सलामीला आला होता. तर वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादव सलामीला आला होता.
क्रिकबझवरील संभाषणादरम्यान, तो म्हणाला की, “आपण सध्या भारतीय संघात जे काही बदल बघत आहोत त्याचे कारण विराट कोहली आहे. टीम इंडियाला विराट कोहलीला प्लेइंग इलेव्हनमध्ये बसवायचे आहे. मात्र, विराट कोहलीने एकदिवसीय मालिका खेळावी अशी माझी इच्छा आहे कारण फॉर्ममध्ये येण्यासाठी तोच फॉरमॅट सर्वोत्तम आहे. ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला भरपूर वेळ मिळतो.”
शिवाय भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सामन्यापूर्व परिषदेत सांगितले होते की, “संघातील पोकळी भरून काढायची आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींचा प्रयत्न केला जात आहे. पहिले इंग्लंड मालिकेत रिषभ पंतला पूर्ण संधी देण्यात आली होती. आता संपूर्ण मालिकेत सूर्यकुमार यादवला सलामीवीर म्हणून पाहायला मिळेल. तसेच रवींद्र जडेजा पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करू शकतो.”
दरम्यान, गेल्या वर्षभराच्या काळात भारतीय संघाने टी२० मध्ये के एल राहुल वगळता ६ खेळाडूंना सलामीवीर म्हणून आजमावले आहे. यामध्ये रोहित शर्मासोबत रिषभ पंत, ऋतुराज गायकवाड, दिपक हुड्डा, इशान किशन, सुर्यकुमार यादव. या खेळाडूंना संधी देम्यात आली आहे. यावरून केवळ १ दिग्गज खेळाडू खराब फॉर्ममध्ये असेल तर संघाला किती मोठा फटका बसू शकतो हे सिद्ध होत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Commonwealth Games : हरमनप्रीत ते मनिका बत्रा, भारताच्या ‘या’ खेळाडूंनी गाजवला स्पर्धेचा पहिला दिवस
केएल राहुलची जागा भरून काढण्यासाठी टीम इंडियाकडे ६ खेळाडूंचा ताफा रेडी, सूर्याचाही समावेश
‘ती असती तर आम्ही…’, पहिल्या टी२० पराभवानंतर रेणूका सिंगने व्यक्त केलं दु:ख