पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने काही दिवसांपूर्वी वादग्रस्त विधान केले. अख्तरच्या मते पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला इंग्लिश बोलता येत नाही, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा अपमान होत आहे. अख्तरने बाबरला एक सुपरस्टार खेळाडू म्हणून देखील मान्यता देण्यास नकार दिला. याच पार्श्वभूमीवर अख्तरवर अनेकांनी टीका केली. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीज राजा यांनीही अख्तरवर निराजी व्यक्त करत निशाणा साधला आहे.
रमीज राजा (Ramij Raja) यांच्या मते क्रिकेट जगतात पाकिस्तानचा दर्जा खालावण्याचे कारण शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याच्यासारखे लोक आहेत. तो आपल्या वक्तव्यांमुळे क्रिकेटचा ब्रांड खराब करतात. रमीज राजा म्हणाले की, “शोएब लांब बसून बोट दाखवतो. पण त्याला करायचे मात्र काहीच नसते. जर गोष्टी योग्य होत नसतील, तर त्या सुधारण्यासाठी जबाबदारी घ्यावी लागते. असे लोक उत्तर देण्यापासून वाचतण्याच्या प्रयत्नात असतात.” दरम्यान, अख्तरने काही दिवासांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष बनण्याची इच्छाही व्यक्त केली होती.
‘पाकिस्तानमध्ये सुपर स्टार खेळाडूं घडवण्यासाठी मला पीसीबी अध्यक्ष बनायचे आहे. जर मी पीसीबी अध्यक्ष असतो, तर खेळाडूंनी पूर्ण मोकळीक दिली असती. ऑस्ट्रेलियामध्ये रात्री साडे सातनंतर त्यांना म्हणालो असतो, चला याठिकाणच्या संस्कृती समजून घेऊ,” असे अख्तर काही दिवसांपूर्वी म्हणाला होता. रमजी राजांनी अख्तरच्या विधानाला एका टीव्ही कार्यक्रमात प्रत्युत्तर दिले. राजा म्हणाले की, “पीसीबी अध्यक्ष बनण्यासाठी शोएब अख्तरला किमान बीए (पदवी) पास होण्याची गरज आहे.”
दरम्यान, शोएब अख्तरने देखील एका लाईव्ह कार्यक्रमातच बाबर आझमच्या खराब इंग्लिशवर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच यावेळी उपस्थित कामरान अकलम () याचा देखील अपमान केला. कामरनची चूक दाखवताना अख्तर म्हणाला की, “मी कामरानला बोलताना ऐकले. तो सकरिन म्हणाला, त्याचा उच्चा स्क्रीन असा असतो.” यावेळीच कामरान अकमलने पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीज राजांवर देखील निशाणा साधला होता. अख्तरच्या मते राजा स्वतःला एक्सपोज करण्यासाठी पीसीबीमध्ये आले होते. आता त्यांना जिथे याजचं तिथं ते गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर राजांनी देखील अख्तरला आता चोख प्रत्युत्तर दिले. (Pass BA first and then can become PCB chairman, ex-legend targets Shoaib Akhtar)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मयंक अकरवालला मिळाले रेस्ट ऑफ इंडियाचे कर्णधारपद, सरफराज खान संघातून बाहेर
शक्यच नाही! दिग्गजाने खोडून काढली ऑस्ट्रेलियाच्या पुनरागमनाची शक्यता, म्हणाला, “भारत 4-0 ने जिंकणार”