मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे शनिवारपासून (२६ डिसेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रलिया संघातील ‘बॉक्सिंग डे’ सामना खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला १९५ धावांवर रोखल्यानंतर भारताने १ बाद ३६ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली आहे. भारताकडून पहिल्या दिवसाखेर नाबाद असलेले चेतेश्वर पुजारा आणि शुबमन गिल फलंदाजीसाठी उतरले होते. परंतु ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने दोघांनाही तंबूत पाठवले. त्यातही पुजाराची विकेट महत्त्वपुर्ण ठरली.
भारताचा अनुभवी फलंदाज पुजारा याला ‘कसोटी स्पेशलिस्ट’ म्हणून ओळखले जाते. पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवसाची सुरुवातही त्याने संयमी फलंदाजी करत केली होती. डावातील २३व्या षटकापर्यंत त्याने एका चौकाराच्या मदतीने १५ धावाही केल्या होत्या. मात्र त्यापुढील षटकात कमिन्सने त्याची विकेट काढली.
कमिन्स डावातील २४वे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या षटकातील पहिल्या तीन चेंडूवर पुजाराने २ धावा घेतल्या. त्यानंतर त्याने पुढील चौथा चेंडू अशाप्रकारे टाकला की, पुजाराने तो साधारणपणे हिट केला आणि चेंडू सरळ यष्टीमागे यष्टीरक्षणासाठी उभा असलेल्या टीम पेनच्या हातात गेला. पेनने एका हाताने हवेत डाइव्ह मारत सुरेख चेंडू पकडला आणि अवघ्या १७ धावांवर पुजाराला पव्हेलियनला रवाना केले.
A pearler of a pluck from Paine! And it's the big wicket of Pujara too!@hcltech | #AUSvIND pic.twitter.com/q4rFhCb7Yj
— cricket.com.au (@cricketcomau) December 27, 2020
विशेष म्हणजे, कमिन्स आणि पेन या गोलंदाज-यष्टीरक्षकांच्या जोडीने पुजारापुर्वी गिललाही अशाच प्रकारे आपल्यात जाळ्यात फसवले होते. गिल ८ चौकारांच्या मदतीने ४५ धावा करत झेलबाद झाला होता. सध्या भारताचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी नाबाद फलंदाजी करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तो खूप मेहनतीने इथे पोहोचला आहे’, भारताच्या प्रमुख गोलंदाजाने केली सिराजची प्रशंसा