ऑस्ट्रेलिया संघ सध्या इंग्लंडमध्ये असून उभय संघात 5 सामन्यांची ऍशेस मालिका 2023 खेळली जात आहे. ही मालिका रोमांचक पद्धतीने पुढे जात आहे. तसेच, यादरम्यान होणाऱ्या वादामुळेही ऍशेस चर्चेचा विषय ठरत आहे. असे असले, तरीही दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सोशल मीडियावर एकमेकांची खिल्ली उडवताना दिसत आहे. यामध्ये कर्णधार पॅट कमिन्स आणि डेविड वॉर्नर यांच्या नावाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, कमिन्सने वॉर्नरला दिलेल्या सल्ल्यानंतर भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत यालाही हसू फुटले आहे.
वॉर्नरच्या पोस्टवर कमिन्सचा लक्षवेधी रिप्लाय
खरं तर, ट्विटरला टक्कर देण्यासाठी फेसबुकचा मालक मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) याने नुकतीच थ्रेड्स (Threads) ही मायक्रोब्लॉगिंग ऍप सुरू केली. खूपच कमी वेळात 1 कोटींहून अधिक लोक थ्रेड्स ऍपशी जोडले गेले. यामध्ये अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. तसं तर, डेविड वॉर्नर (David Warner) हा सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतो. तसेच, तो सिनेमातील डायलॉग बोलण्यासोबतच डान्स व्हिडिओही पोस्ट करत असतो. त्याचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. अशात वॉर्नर थ्रेड्सवरही आला आहे.
वॉर्नरने पोस्ट शेअर करत पॅट कमिन्स (Pat Cummins) याला टॅग करत लिहिले की, “मी आता थ्रेड्सवर आहे.” यावेळी कमिन्सने रिप्लाय देत म्हटले की, “कृपया, इथे डान्स व्हिडिओ शेअर करू नको.” दुसरीकडे, रिषभ पंत (Rishabh Pant) याने कमेंट करत लिहिले की, “सर्वोत्तम सल्ला भावा.” यावेळी पंतने हसणाऱ्या दोन इमोजीचाही कमेंटमध्ये समावेश केला. रिषभ पंत दीर्घ काळापासून क्रिकेटपासून दूर आहे. सध्या तो वेगाने फिट होण्याचा प्रयत्न करत आहे.
David Warner on threads. Hilarious conversations between Pat Cummins, Rishabh Pant joined too. #Ashes23 #Cricket pic.twitter.com/GpIjblIZEM
— Md Shadab Akhtar (@md07shadab) July 8, 2023
ऍशेसमध्ये ऑस्ट्रेलिया आघाडीवर
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (England vs Australia) संघ तिसऱ्या कसोटी सामन्यात आमने-सामने आहेत. हा सामना लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर खेळला जात आहे. दोन दिवसांचा खेळ संपला असून ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावातील धावसंख्या 4 बाद 116 इतकी आहे. पहिल्या डावात 4 धावांवर बाद होणारा वॉर्नर, दुसऱ्या डावात फक्त 1 धावेवर तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 263 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघाचा डाव 237 धावांवर संपुष्टात आला. पावसामुळे तिसऱ्या दिवशी शनिवारचा खेळ निश्चित वेळेवर सुरू होऊ शकला नाही. विशेष म्हणजे, पहिले दोन कसोटी सामने जिंकून ऑस्ट्रेलिया संघ 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0ने आघाडीवर आहे. (pat cummins gives david warner strange advice on threads rishabh pant says this read here)
महत्वाच्या बातम्या-
निवृत्तीनंतरही भारतीय क्रिकेटपटूंवर बीसीसीआयची दादागिरी? लवकरच घेणार ‘हा’ निर्णय
शतक ठोकत सलामीवारांनी घडवला मोठा इतिहास! अफगाणिस्तानकडून कुणीच केली नव्हती ‘अशी’ कामगिरी