ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स अहमदाबाद कसोटीतून देखील बाहेर पडला आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर कमिन्स वैयक्तिक कारणास्तव मायदेशात परतला होता. अशात तिसऱ्या कसोटी सामन्यात स्टीव स्मिथ याने संघाचे नेतृत्व केले आणि विजय मिळवून दिली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार कमिन्स चौथ्या कसोटीसाठीही उपलब्ध नसेल आणि स्मिथ पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याची आई माहिरी आजारी असल्यामुळे तो तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी मायदेशात परतला होता. माहितीनुसार कमिन्सच्या आईला ब्रेस्ट कॅन्सर झाला असून ऑस्ट्रेलियन कर्णधार आईची काळजी घेण्यासाठी सिडनीत आहे. ऑस्ट्रेलियन संघाला ही बॉर्डर गावसकर कसोटी मालिका संपल्यानंतर भारतात तीन सामन्यांची वनडे मालिकादेखील खेळायची आहे.
कमिन्स तिसऱ्या कसोटीनंतर चौथ्या कसोटीतून देखील बाहेर पडला. अशात वनडे मालिकेतील देखील तो येत्या काही दिवासंमध्ये माघार घेऊ शकतो. मात्र, अद्याप याविषयी कुठलीच ठोक माहिती मिळाली नाहीये. कमिन्सने मागच्याच वर्षी ऑस्ट्रेलियन वनडे संघाचे कर्णधारपद स्वीकारले होते. अशात वनडे मालिकेतून त्याने माघार घेतल्यानंतर संघाला पुन्हा नवीन कर्णधाराची आवश्यकता असेल.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन (Jhye Richardson) याला मात्र तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून माघार घ्यावी लागली. माहितीनुसार रिचर्डसनचे हॅमस्ट्रिंग दुखावले गेल्यामुळे त्याला आगामी वनडे मालिकेत खेळता येणार नाहीये. ऑस्ट्रेलियन संघातील त्याची जागा भरण्यासाठी संघ व्यवस्थापनाने नाथन एलिस (Nathan Ellis ) याला संघात सामील केले आहे. रिचर्डसनची दुखापत मुंबई इंडियन्ससाठीही चिंतेची बाब आहे. कारण त्याला यातून बाहेर पडण्यासाठी पुढचा मोठा काळ लागू शकतो. आयपीएल 2023 येत्या 20 मार्च रोजी सुरू होणार असल्यामुळे रिचर्डसनला आयपीएलमधूनही माघार घ्यावी लागू शकते.
(Pat Cummins has been ruled out of the fourth Test, Steve Smith will take over as captain)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ग्रेस हॅरिसमुळे गुजरातचा सलग दुसरा पराभव, शेवटच्या षटकात कुटल्या संघाच्या गरजेपेक्षा जास्त धावा
भारतीय बॉलिंगचा मूळपुरुष निसार! स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानात जाऊन हलाखीत जगला