इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या सामन्यात बुधवारी (०६ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्सचा पॅट कमिन्स मुंबई इंडियन्स संघावर चांगलाच बरसला. कमिन्सच्या अर्धशतकाच्या जोरावर कोलकाताने ५ विकेट्सने विजय मिळवला. आयपीएलच्या १५व्या हंगामात खेळलेल्या ४ सामन्यांतील हा त्यांचा तिसरा विजय होता. विशेष म्हणजे, कमिन्सचा आयपीएल २०२२मधील हा पहिलाच सामना होता. त्याने ज्याप्रकारे फलंदाजी आणि गोलंदाजीत शानदार कामगिरी केली, त्यासाठी त्याला सामनावीर पुरस्काराचा पुरस्कार देण्यात आला. इतकंच नाही, तर कमिन्सने मुंबई संघाविरुद्ध यापूर्वीही चांगलीच फटकेबाजी केली आहे. तीच आकडेवारी आपण पाहणार आहोत. (Pat Cummins In IPL Against Mumbai Indians)
पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात कमिन्सने (Pat Cummins) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वादळी खेळी केली. त्याने अवघ्या १४ चेंडूत ५० धावा करत केएल राहुलच्या वेगवान अर्धशतकाची बरोबरी केली. या धावा करताना त्याने ४ चौकार आणि ६ षटकार ठोकले. पुढे त्याने १५व्या चेंडूवरही षटकार ठोकत नाबाद ५६ धावा केल्या. त्याने गोलंदाजीतही तितकीच शानदार कामगिरी केली. गोलंदाजी करताना कमिन्सने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके टाकताना ४९ धावा देत २ विकेट्स खिशात घातल्या.
Pat Cummins finishes things off in style!
Also brings up the joint fastest half-century in #TATAIPL off 14 deliveries.#KKR win by 5 wickets with 24 balls to spare.
Scorecard – https://t.co/22oFJJzGVN #KKRvMI #TATAIPL pic.twitter.com/r5ahBcIWgR
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2022
यापूर्वीच्या ३ सामन्यांबद्दल बोलायचं झालं, तर कमिन्सने यापूर्वी मुंबईविरुद्ध खेळताना २०२०मधील एका सामन्यात १२ चेंडूत ३३ धावा ठोकल्या होत्या. त्यावेळी त्याने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर ४ कडक षटकार ठोकले होते. त्यानंतर त्याने आयपीएल २०२०मधीलच एका सामन्यात मुंबईविरुद्ध ३६ चेंडूत नाबाद ५३ धावांची खेळी केली होती. त्यामध्ये २ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता. फक्त एका सामन्यात त्याच्याविरुद्ध मुंबई संघाचं पारडं जड दिसलं. त्याला शून्य धावेवर तंबूत परतावं लागलं होतं.
पॅट कमिन्सच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत एकूण ३८ सामने खेळताना २७ डावात २३.२५च्या सरासरीने ३७२ धावा केल्या आहेत. यामध्ये ३ अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ३८ सामन्यातील ३८ डावात गोलंदाजी करताना ८.३५च्या इकॉनॉमी रेटने ४० विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी ३४ धावा देत ४ विकेट्स ही आहे.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध पॅट कमिन्सची कामगिरी
१२ चेंडू- ३३ धावा
३६ चेंडू- ५३ धावा*
१ चेंडू- ० धावा
१५ चेंडू- ५६ धावा*
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पॅट कमिन्सकडून मुंबईच्या गोलंदाजांनी मनसोक्त धुलाई! अवघ्या १४ चेंडूत झळकावले विक्रमी अर्धशतक
MI vs KKR | मुंबईची पराभवाची हॅट्रिक, कमिन्सच्या विक्रमी अर्धशतकाच्या जोरावर कोलकाताचा शानदार विजय
दिल्ली कॅपिटल्ससाठी आनंदाची बातमी! ‘हे’ दोन खेळाडू संघात आल्याने मिटणार फलंदाजी अन् गोलंदाजीची कटकट