---Advertisement---

पॅट कमिन्सवर कोसळला दुःखाचा डोंगर! आई मारियाचे निधन, ऑस्ट्रेलियन संघाकडून मिळाली श्रद्धांजली

On: शुक्रवार, मार्च 10, 2023 10:22 AM
Pat Cummins Family
---Advertisement---

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी (10 मार्च) पॅट कमिन्स याची आई मारियाचे निधन झाल्याची माहिती दिली. सध्या सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील दुसऱ्या सामन्यानंतर कमिन्स त्याच्या आईची काळजी घेण्यासाठी मायदेशात परतला होता. पण अशातच शुक्रवारी ही दुःखद बातमी समोर आली. कमिन्सच्या आईला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ अहमदाबाद कसोटीच्या दुसऱ्या दिवशी हातावर काळी फीत बांधून खेळत आहे.

“मारिया कमिन्सच्या रात्रीत निधन झाल्याने आम्हाला दुःख झाले. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या वतीने, आम्ही पॅट कमिन्स, त्याचे कुटुंब आणि त्यांच्या मित्रांसाठी मनापासून शोक व्यक्त करतो. ऑस्ट्रेलियन पुरुष संघ आज श्रद्धांजली म्हणून हातावर काळ्या पट्ट्या बांधेल, ”क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या ट्विटमध्ये लिहिले.

पॅट कमिन्स (Pat Cummins) याची आई मारिया मागच्या मोठ्या काळापासून ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत होती. पण अखेर शुक्रवारी (10 मार्च) दिवस उगवण्याच्या आधी तिची प्राणज्योत मावळली. आईची तब्येत गंभीर असल्यामुळेच कमिन्स बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023च्या दुसऱ्या सामन्यानंतर मायदेशात परतला. आईची तब्येत सुधारत नसल्याने कमिन्से सुरुवातील तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली आणि अखेर गुरुवारी (9 मार्च) सुरू झालेल्या चौथ्या कसोटीसाठीही त्याला उपस्थित राहता आले नाही.

दरम्यान, उभय संघांतील तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी कमिन्स उफस्थित नसल्यामुळे स्टीव स्मिथ (Steve Smith) याने कर्णधाराची भूमिका पार पाडली. स्मिथच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने तिसरा कसोटी सामना जिंकला आणि जोरदार पुनरागमन केले. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचे जांगतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील स्थान देखील पक्के झाले आहे. उभय संघांतील हा चौथा कसोटी सामना भारताने जिंकला, तर भारतीय संघ देखील कसोटी अजिंक्यपद पटकावण्यासाठी अंतिम सामन्यात स्थान पक्के करू शकतो. (Pat Cummins’ mother Maria passed away)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“मला आऊट व्हायचे नव्हते”, दमदार शतकानंतर ख्वाजाने सांगितला आपला गेमप्लॅन
स्टीव्ह ‘फेल’ स्मिथ! चांगल्या सुरवातीनंतरही संपूर्ण मालिकेत फ्लॉप ठरलाय ऑसी कर्णधार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---