ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला. त्याला 19 डिसेंबरला झालेल्या 2020च्या लिलावात कमिन्सला कोलकाता नाइट रायडर्सने 15 कोटी 50 लाख रुपयांना खरेदी केले.
परंतू कमिन्सला अजूनही पंधरा कोटी रुपयाचे काय करायचे असा प्रश्न पडला आहे, परंतु या ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाला खात्री आहे की या पैशाचा त्याच्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
न्यूझीलंड विरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी कमिन्स म्हणाला की, ‘मी बदलू नये म्हणून मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. मी भाग्यवान आहे की माझ्या आजूबाजूला माझे लोक आहेत.’
आयपीएलमधून मिळणाऱ्या पैशातून आपण काय करणार असे विचारले असता तो म्हणाला की, मी अद्याप कोणतीही योजना आखलेली नाही.
तो म्हणाला, ‘मी काय करावे हे मला माहित नाही. माझ्या प्रेयसीने सांगितले की आपण आपल्या कुत्र्यासाठी काही खेळणी खरेदी करू शकतो.’
26 वर्षीय कमिन्स म्हणाला, मी क्रिकेट खेळतो कारण मला ते आवडते. मला मिळालेल्या सर्व गोष्टींसाठी मी स्वत: ला भाग्यवान मानतो. ”
कमिन्स सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे.
कमिन्सने आतापर्यंत 28 कसोटी आणि 58 वनडे आणि 25 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटी सामन्यात 134, वनडे सामन्यात 96 आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 32 विकेट्स घेतल्या आहेत.
कमिन्सने प्रथम 2014 च्या हंगामात आयपीएलमध्ये खेळला होता, पण त्यानंतर त्याला 1 एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. 2017 च्या मोसमात त्याने 12 सामन्यांत एकूण 15 विकेट घेतले. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 16 सामने खेळले असून एकूण 17 विकेट्स घेतल्या आहेत.
२०१९ या वर्षातील फक्त 'ती' गोष्ट बदण्याची विराट कोहलीला इच्छा
वाचा- 👉https://t.co/eUChoX7GYU👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @Mazi_Marathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 25, 2019
माझ्यासाठी ही नवी सुरुवात असली तरी फलंदाजी करणे विसरलेलो नाही-शिखर धवन
वाचा- 👉https://t.co/WVdxdjQxpl👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @Mazi_Marathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 25, 2019