---Advertisement---

‘तो’ झेल लखनऊसाठी होता खूपच महत्वाचा, पकडल्यानंतर कृणालने एकदा नाही, तर दोनदा केले किस

Krunal-Pandya
---Advertisement---

चालू आयपीएल हंगामातील ४२व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जला २० धावांनी पराभूत केले. नाणेफेक गमावल्यानंतर लखनऊने प्रथम फलंदाजी करताना १५४ धावांचे लक्ष्य उभे केले. प्रत्युत्तरात पंजाबला हे लक्ष्य गाठता आले नाही. लखनऊचा अष्टपैलू कृणाल असे काही केले, ज्यामुळे सर्वांचे लक्ष्य त्याच्याकडे आकर्षित झाले.

लखनऊ सुपर जायंट्सकडून मिळालेल्या १५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जेव्हा लखनऊचा संघ मैदानात उतरला, तेव्हा त्यांची सुरुवात अपेक्षित होऊ शकली नाही. अवघ्या ४६ धावांवर संघाने दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर जॉनी बेयरस्टोने पंजाबचा डांव सांभाळला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

बेयरस्टो ३२ धावांवर खेळत असताना डावाच्या १६ व्या षटकात दुष्मंता चमीराच्या त्याने थर्ड मॅनच्या दिशेने मोठा शॉट खेळला, जो सरळ कृणाल पांड्या (Krunal Pandya) याच्या हातात गेला. हा झेल कृणालने अप्रतिमपणे पकडला आणि दोन वेळा चेंडूल किस करताना दिसला. झेल पकडल्यानंतर कृणालच्या या रिऍक्शननंतर ही विकेट लखनऊसाठी किती महत्वाची होती, हे समजते.

कृणाल पांड्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, उभय संघातील हा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर खेळला गेला. नाणेफेक गमावल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट्सच्या नुकसानावर १५३ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने मर्यादित २० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर १३३ धावा केल्या आणि २० धावांनी पराभव स्वीकारला.

या विजयानंतर लखनऊ सुपर जायंट्सने गुणतालिकेतील स्वतःचे स्थान उंचावले आहे. आधी लखनऊ चौथ्या क्रमांकावर होता आणि सनरायझर्स हैदराबादला मागे टाकून लखनऊचा संघ तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. लखनऊने चालू हंगामात आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यांपैकी ६ सामने जिंकले आहेत आणि प्रत्येक सामन्यात २ या हिशोबाने १२ गुण मिळवले आहेत. दुसरीकडे पंजाबचा विचार केला, तर त्यांनी ९ पैकी ४ सामने जिंकले आहेत आणि ८ गुणांसह संघ सातव्या क्रमांकावर कायम आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

नशीबच फुटकं! खणखणीत अर्धशतक झळकावूनही विराट का होतोय ट्रोल? जाणून घ्या कारण

स्विगीच्या वाईट सेवेवर संतापला शुबमन गिल; जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्ककडेच केली तक्रार

ब्रेकिंग! फुटबॉल विश्वातील ‘सुपर एजंट’ने घेतला जगाचा निरोप, प्रसिद्ध खेळाडूंचे केले होते प्रतिनिधित्व

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---