---Advertisement---

PBKS vs RR: प्रियांश आर्यच्या षटकाराने एका चाहत्याला गंभीर दुखापत, डोळा थोडक्यात वाचला! VIDEO व्हायरल

On: बुधवार, एप्रिल 29, 2026 12:44 PM
---Advertisement---

आयपीएल २०२६ मध्ये मंगळवारी (२८ एप्रिल) पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना खेळला गेला. मुल्लाणपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यादरम्यान स्टेडियममधील एका चाहत्याला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रणामात रक्तस्रावही झाला. त्या चाहत्याला प्रियांश आर्यमुळे दुखापत झाली.

या सामन्यात आरआरचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकत पीबीकेएसला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. आर्यने नेहमीप्रमाणे धमाकेदार सुरूवात केली. त्याने आरआरविरुद्ध ११ चेंडूत पाच चौकार आणि एका षटकारासह २९ धावा केल्या. त्याचा हा एकमेव षटकार स्टेडियममध्ये बसलेल्या पीबीकेसच्या एका वृद्ध चाहत्यासाठी जीवघेणा ठरला. तो चेंडू थेट त्या चाहत्याच्या चेहऱ्यावर, डोळा आणि नाक यांच्या मधल्या भागावर लागला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्रावाला सुरूवात झाली. त्या व्यक्तिवर लगेचच वैद्यकिय पथकाने उपचार केले आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले गेले.

सर्वसाधारणपणे स्टेडियममध्ये होणाऱ्या कोणत्याही दुखापती किंवा नुकसानीसाठी आयपीएलचे आयोजक थेट जबाबदार नसतात. हे तिकीटाच्या नियमांमध्येही नमूद केलेले असते. वैद्यकिय नियमानुसार ते आयोजक त्या व्यक्तीची प्राथमिक तपासणी करतात आणि आवश्यक असल्यास त्यांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत करतात.

प्रियांश या हंगामात चांगलाच फॉर्ममध्ये आहे. त्याने सात सामन्यांमध्ये ४०.४२च्या सरासरीने २८३ धावा केल्या आहेत. या सामन्यात पीबीकेएसने २० षटकात ४ विकेट्स गमावत २२२ धावा केल्या. यामध्ये प्रभसिमरन सिंगने ५९ धावा केल्या. तसेच मार्कस स्टॉयनिस २२ चेंडूत ६२ धावा करत नाबाद राहिला. प्रत्युत्तरात आरआरने आक्रमक सुरूवात केली.

यशस्वी जायस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी २० चेंडूत ५१ धावांची भागीदारी केली. वैभव ४३ धावा (१६) करत बाद झाला. यशस्वीने २७ चेंडूत ५१ धावा केल्या. त्यानंतर काही अंतराने आरआरच्या विकेट्स पडत राहिल्या. डोनोव्हन फेरेरा आणि शुभम दुबे यांनी नंतर संघाचा डाव सांभाळला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ३२ चेंडूत ७७ धावांची भागीदारी केली. फेरेरा ५२ धावा (२६) आणि दुबे ३१ धावा (१२) करत नाबाद राहिले. हा सामना आरआरने ६ विकेट्सने जिंकला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---