आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा 12वा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात शनिवारी (दि. 14 ऑक्टोबर) खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवरील या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव केला. या सामन्यादरम्यान असे काही घडले, ज्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मंगळवारी (दि. 17 ऑक्टोबर) आयसीसीपुढे 3 तक्रारी दाखल केल्या. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला तर जाणून घेऊयात…
पाकिस्तानने आयसीसीकडे केलेल्या तक्रारीत म्हटले गेले आहे की, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम (Narendra Modi Stadium) येथे त्यांच्या खेळाडूंसोबत ‘अयोग्य वर्तन’ केले गेले. याव्यतिरिक्त पीसीबीने पाकिस्तानी पत्रकारांसाठी व्हिसामध्ये उशीर झाल्याचीही तक्रार केली. तसेच, भारतात पाकिस्तानी चाहत्यांना येऊ न दिल्याबद्दलचीही चिंता आयसीसीपुढे व्यक्त केली.
पीसीबीच्या तीन तक्रारी
पीसीबीने मंगळवारी ट्विटरवरून याची माहिती दिली. पीसीबीच्या ट्विटर हँडलवर लिहिले गेले की, “पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानी पत्रकारांच्या व्हिसामध्ये उशीर आणि चालू विश्वचषकात पाकिस्तानी चाहत्यांच्या अनुपस्थितीविषयी आयसीसीपुढे औपचारिक विरोध दाखल केला. याव्यतिरिक्त 14 ऑक्टोबर, 2023रोजी भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान आमच्या खेळाडूंसोबत चुकीचा व्यवहाराशी संबंधित एक तक्रार केली गेली आहे.”
अहमदाबादेत काय घडलं?
खरं तर, अहमदाबादमध्ये ज्या दिवशी भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामना खेळला गेला, तिथे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) जेव्हा नाणेफेकीवेळी बोलत होता, तेव्हा स्टेडिअममध्ये आरडा-ओरडा सुरू होता. तसेच, मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याचाही एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. यामध्ये रिझवान बाद होऊन पव्हेलियनकडे जात होता. त्याचवेळी काही प्रेक्षकांनी ‘जयश्री राम’ म्हटले होते. पाकिस्तानने या दोन घटनांना आपल्या तक्रारीचा आधार बनवले.
The Pakistan Cricket Board (PCB) has lodged another formal protest with the ICC over delays in visas for Pakistani journalists and the absence of a visa policy for Pakistan fans for the ongoing World Cup 2023.
The PCB has also filed a complaint regarding inappropriate conduct…
— PCB Media (@TheRealPCBMedia) October 17, 2023
हैदराबाद आणि अहमदाबादमधील पाहुणचार विसरला पाकिस्तान
यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाचा हैदराबादमध्ये जो पाहुणचार झाला होता, तो पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दुर्लक्षित केला. हैदराबादमध्ये पाकिस्तानी खेळाडूंचे विमानतळापासून ते हॉटेलपर्यंत जंगी स्वागत झाले होते. एवढंच नाही, तर हॉटेल स्टाफनेही पाकिस्तानी खेळाडूंचे जोरदार स्वागत केले होते. याव्यतिरिक्त जेव्हा भारताविरुद्धच्या सामन्यासाठी संघ अहमदाबादला पोहोचला, तेव्हा तिथेही पाकिस्तानी खेळाडूंचे जंगी स्वागत झाले होते.
पाकिस्तानचा नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये लाजीरवाणा पराभव
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये पाकिस्तानी संघाला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारताने पाकिस्तानला 191 धावांवरच सर्वबाद केले होते. यानंतर हे आव्हान भारतीय संघाने 30.3 षटकात 3 विकेट्स गमावत पार केले होते. या सामन्यात पाकिस्तान संघाचे 8 विकेट्स फक्त 35 धावांमध्ये पडल्या होत्या. पाकिस्तानच्या या प्रदर्शनामुळे त्यांच्यावर जोरदार टीकाही होत आहे. हा पाकिस्तान संघाचा विश्वचषकातील पहिले दोन सामने जिंकल्यानंतर पहिला पराभव होता. (pcb complaint over india vs pakistan 12th match in narendra modi stadium icc read)
हेही वाचा-
बिग ब्रेकिंग! 9 वर्षांनंतर मुंबई इंडियन्सपासून वेगळा झाला ‘हा’ दिग्गज, फ्रँचायझीने स्वत: दिली माहिती
सलग दोन पराभवांचं तोंड पाहिलेल्या बांगलादेशपुढे रोहितसेनेचं आव्हान, पुण्यातही खणकणार का टीम इंडियाचं नाणं?