पाकिस्तान संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी रविवारी (13 नोव्हेबर) दुखापतग्रस्त झाला. आफ्रिदीने टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला ऐन वेळी अडचणीत टाकले. आफ्रिदीच्या दुखापीतनंतर पाकिस्तान संघाला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडकडून पराभव मिळाला. त्याला झालेली दुखापत गंभीर असण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण समोर येत असलेली माहीत नक्कीच पाकिस्तानची चिंता कमी करणारी आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) याला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात झालेली दुखापत जास्त गंभीर दिसत नाहीये. पीसीबीने सोमवारी (14 नोव्हेंबर) याविषयी माहिती दिली की, आफ्रिदीच्या स्कॅनमध्ये कुठलीही गंभीर दुखापत दिसली नाहीये. त्याला पुढचे दोन आठवडे विश्रांती आणि दुखापतीवर काम मात्र करावे लागणार आहे.
शाहीन आफ्रिदीच्या फिटनेसविषयी माहिती चाहत्यांना देण्यासाठी पीसीबीने सोमवारी सविस्तर निवेदन जारी केले. यात म्हटले केले की, “रविवारी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022च्या अंतिम सामन्यादरम्यान हॅरी ब्रुकचा झेल घेताना शाहीन आफ्रिदीला दुखापत झाली. त्याला रिहॅब करण्याचा सल्ला दिला गेला आहे.” आफ्रिदीला गंभीर दुखापत झाल्याचे कुठलेही संकेत दिसत नाही, असेही या निवेदनात म्हटले गेले आहे.
आता मायदेशात परतल्यानंतर पीसीबी आफ्रिदीला रिहॅबसाठी नॅशनल हाय परफॉर्मेंस सेंटर याठिकाणी पाठणार असल्याचे सांगितले गेले आहे. याठिकाणी त्याच्या गुडघ्यावर काम केले जाईल आणि सराव देखील करून घेतला जाईल. पीसीबीने दिलेल्या माहितीनुसार आफ्रिदी हा रिहॅबचा कार्यकाळ पूर्ण करेल आणि त्यानंतर मेडिलक स्टाफने हिरवा कंदील दाखवल्यानंतर पुन्हा संघात येऊ शकतो.
दरम्यान, टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आफ्रिदीला झालेली दुखापत पाकिस्तानला चांगलीच महागात पडली आहे. अंतिम सामन्यात आफ्रिदीने त्याचे पहिले दोन षटके पूर्ण टाकले, पण तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकल्यानंतर मात्र त्याला तीव्र वेदान होताना दिसल्या. याच कारणास्तव त्याने मैदान देखील सोडले. पहिल्या दोन षटकांमध्ये त्याने 13 धावा देत एक विकेट घेतली होती. पण शेवटची दोन षटके मात्र त्याला टाकता आली नाहीत. आफ्रिदी जर त्याचा षटकांचा कोटा पूर्ण करू शकला असता, तर नक्कीच सामन्याच्या नाकालावर देखील परिणाम पडू शकत होता. (PCB give an update on Shaheen Afridi injury)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान क्रिकेटमध्ये होणार तख्तापालट? पुढील कर्णधार म्हणून या नावाची चर्चा
सूर्यकुमार बनला टी-20 विश्वचषकाचा सुपर स्ट्रायकर, आयसीसीने जाहीर केली यादी