पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) बोर्डाच्या ‘खेळाडू कल्याण धोरणाचे’ उल्लंघन केल्यामुळे माजी वेगवान गोलंदाज सरफराज नवाज यांची मासिक पगार बंद केली आहे. ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या सरफराज यांनीही आपल्या पगारातील थकबाकी रक्कम न दिल्याने पाकिस्तान बोर्डाविरोधात स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
बोर्डाच्या एका सूत्राने सांगितले की, “बोर्डाविरोधात न्यायालयात जाणे हे खेळाडू कल्याणकारी धोरणाचे उल्लंघन आहे. कारण त्यांच्याकडून सतत बोर्ड अधिकारी आणि खेळाडूंचा अपमान केला जात आहे. बोर्डाच्या माजी अधिकाऱ्यांनी देखील सरफराज यांची पेन्शन थांबवली होती. त्यांना इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि खेळाडूंवर आरोप करण्याची सवय आहे. यापूर्वी देखील त्यांना पाकिस्तान क्रिकेटची प्रतिमा खराब करू नये, अशी चेतावणी देण्यात आली होती.”
सरफराज हे खेळाडूंवर टीका करण्यासाठी ओळखले जातात. यापूर्वी देखील त्यांनी पाकिस्तानी खेळाडूंवर सामना फिक्सिंग करण्याचे आरोप केले होते. (Pcb stops monthly pension of Sarfaraz Nawaz for violating players welfare policy)
एका डावात ८६ धावा खर्च करत बाद केले होते ९ गडी
सरफराजने आपल्या कारकीर्दीत एकूण ५५ कसोटी सामने आणि ४५ वनडे सामने खेळले आहेत. रिव्हर्स स्विंग गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सरफराजने १९७९ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांनी एकाच डावात ९ गडी बाद करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते.
या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला ३८४ धावांचे आव्हान मिळाले होते. ऑस्ट्रेलियन संघाच्या धावा ३ बाद ३०५ होत्या. त्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या सरफराजने ३३ चेंडुंमध्ये ४ धावा देत ७ गडी बाद केले होते. ऑस्ट्रेलियन संघाचा डाव ३१० धावांवर संपुष्टात आला होता. या डावात त्यांनी ८६ धावा देत ९ गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. तर एक फलंदाज धावबाद झाला होता.
कसोटी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी
सरफराजने ५५ कसोटी सामन्यात १८ च्या सरासरीने १०४५ धावा केल्या. यादरम्यान त्यांनी ४ अर्धशतक झळकावले होते. यायाव्यतिरिक्त त्यांनी १७७ गडी देखील बाद केले होते. यामध्ये त्याने ४ वेळेस ५ गडी बाद करण्याचा आणि १ वेळेस १० गडी बाद करण्याचा कारनामा केला होता. तसेच वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी ४५ वनडे सामन्यात २२१ धावा केल्या आहेत. यासह त्यांनी ६३ गडी देखील बाद केले. तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावे १००० पेक्षा अधिक गडी बाद करण्याचा विक्रम आहे. २९९ सामन्यात त्यांनी १००६ गडी बाद केले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
लॉर्ड्सवर हसन अलीचा ‘मोठा’ कारनामा, पाच बळींसह केली ‘अशी’ ऐतिहासिक कामगिरी
इंग्लंडने पाकिसूर्यकुमारने निवडला सर्वकालिन आयपीएल संघ, यष्टीरक्षक म्हणून धोनीला नाही, तर ‘या’ खेळाडूला दिले
स्थानस्तानला पुन्हा एकदा पाजले पराभवाचे पाणी, सोप्या विजयासह मालिका घातली खिशात