पिंपरी: राज्यातील आणि देशातील अग्रगण्य महानगरपालिकांपैकी एक असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या संलग्नतेने पीसीएमसी भागातील खेळाडू, प्रशिक्षक आणि टेनिसच्या विकासासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
पीसीएमसी आणि एमएसएलटीए यांच्यातील या सहकार्यामुळे पीसीएमसी क्षेत्रातील टेनिसला खूप चालना मिळेल, जी आधीपासून लोकप्रियता मिळवत आहे. पीसीएमसी भागात 22 हून अधिक कोर्ट आहेत आणि तसेच, सर्व वयोगटातील टेनिसपटूंची संख्याही चांगली आहे. पण खेळाडूंना न मिळणारा योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि चांगली स्पर्धात्मक संकल्पनेची गरज असल्याचे पीसीएमसी महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.
एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, पीसीएमसी शहरात खेळाविषयी राजेश पाटील यांचा दृष्टिकोन पाहून आम्हाला आनंद झाला आहे. पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) आणि माजी डेव्हिस कूपर व अर्जुन पुरस्कार विजेते गौरव नाटेकर यांच्या सहकार्याने पीसीएमसीशी संलग्न होऊन टेनिस खेळाच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी आम्ही उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.
याच हेतून पुढाकार घेऊन महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)च्या वतीने एमएसएलटीए सुहाना स्मार्ट 10 वर्षाखालील राज्य मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेची पुढील स्पर्धा निगडी टेनिस कोर्ट या ठिकाणी 4 ते 6 जून 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय प्रशिक्षकांसाठी एमएसएलटीए सर्टिफिकेट व कोर्सेचे 26, 27,28,29,30 जून 2022 दरम्यान आयोजन देखील करण्यात आले आहे.
पीसीएमसी भागातील प्रशिक्षकांना अद्यावत करण्यासाठी आणि सध्याचे प्रशिक्षण तंत्रज्ञान अवगत करण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामुळे प्रशिक्षकांना प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी नवीन तंत्रज्ञानामुळे पीसीएमसी भागातील खेळाडूंना नक्कीच याची मदत होईल असे स्पर्धा संचालक नंदू रोकडे यांनी सांगितले.
भविष्यात आम्ही पीसीएमसीला विनंती करू की महानगरपालिकेने निर्माण केलेल्या टेनिस सुविधा फक्त त्या प्रशिक्षकांना द्या ज्यांच्याकडे प्रमाणपत्र असेल, याचे कारण म्हणजे यामुळे पीसीएमसी भागातील खेळाडूंचा दर्जा उंचावेल, असे अय्यर यांनी नमूद केले.
आगामी वर्षात पीसीएमसी व एमएसएलटीए यांच्या संलग्नतेने राष्ट्रीय स्तरावरील पुरुष व महिला टेनिस स्पर्धा, आंतरराज्य अजिंक्यपद स्पर्धा एशिअवय एआयटीए कुमार टेनिस मानांकन स्पर्धा ऑकटोबर व नोव्हेंबरमध्ये आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या भागात अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी एमएसएलटीए व पीसीएमसी यांच्याशी चर्चा करत असून यामुळे आगामी काही काळात आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा आयोजित करता येईल.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मयंक अगरवालने IPL 2022मध्ये का केली खराब कामगिरी? हरभजन सिंगने दिले स्पष्टीकरण
‘गब्बर’ पडलाय प्रेमात! व्हिडिओ शेअर करत धवनने लिहिले, ‘मोहम्मत मैं बादशाह भी गुलाम बन जाता है’
पहिले पाढे पंचावन्न..! लाख प्रयत्न करूनही आरसीबीच्या पदरी पुन्हा अपयशच