भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याच्या मते विराट कोहली आणि एमएस धोनीसारख्या खेळाडूंना नेहमीच महत्व मिळत आले आहे. परंतु, जसप्रीत बुमराहचे प्रदर्शन देखील वाखाणण्याजोगे आहे. कैफच्या मते जसप्रीत बुमराह असा खेळाडू आहे, जो संघासाठी सतत आणि दबावाच्या परिस्थितीत चांगले प्रदर्शन करत आला आहे. बुमराहमुळे भारतीय संघाला विदेशात यश मिळाले, असाही उल्लेख कैफने केला.

अशियामधील सर्वोत्तम क्रिकेटपटूंविषयी प्रश्न विचारला असता, कैफ म्हणाला की, “हे अवघड आहे, पण मला बुमराह आवडतो. लोक कोहलीपासून ते धोनीसारख्या फलंदाजांविषयी खूप बोलताना. ते सर्वजण महान खेळाडू आहेत. परंतु, बुमराह सारखा एखादा खेळाडू, जो खूप शांत स्वभावाचा आहे आणि दबावाच्या परिस्थितीत काम करतो, जे आपण मागच्या काही वर्षांपासून पाहिले आहे. तो सर्व प्रकारांमध्ये चालणाऱ्या खेळाडूच्या रूपात समोर येत आहे. त्याच्यामुळे भारताची विदेशात कसोटी जिंकण्याची टक्केवारी सुधारली आहे.” मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) विषयी स्पोर्स्ट्सकीडासोबत बोलताना व्यक्त झाला.