---Advertisement---

VIDEO: ‘मोठे ऑक्शन होणार आहे’, जॉस बटलरने आयपीएल लिलावात अडकलेल्या ‘या’ ऑस्ट्रेलियन स्टारला केले स्लेज

On: शुक्रवार, नोव्हेंबर 18, 2022 1:13 PM
Jos Butler Comment on IPL To Cameron Green
---Advertisement---

आयपीएल (IPL)2023च्या हंगासामाठी छोट्या प्रकारचा लिलाव होणार आहे. यामध्ये भारताबरोबरच अनेक विदेशी खेळाडूंमध्ये चढाओढ दिसेल. हा लिलाव कोची येथे 23 डिसेंबरला होणार आहे. या लिलावाआधी सर्व फ्रॅंचायजींनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या लिलावामध्ये काही खेळाडूंना मोठी बोली लावण्याची शक्यता आहे. याचाच प्रत्यय ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या वनडे मालिकेदरम्यान आला.

दुसऱ्यांदा टी20 विश्वचषकाचा विजेता संघ इंग्लंडला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. यातील पहिला सामना गुरूवारी (17 नोव्हेंबर) खेळला गेला, ज्यामध्ये इंग्लंडला 6 विकेट्सने सामना गमवावा लागला. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू होती तेव्हा इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jos Vuttler) याने केलेली एक कमेंट ऐकून कॅमेरून ग्रीन देखील हसताना दिसला.

झाले असे की,  ऑस्ट्रेलियाच्या डावातीव 40वे षटक सुरू होते. बटलर विकेटकीपिंग करताना ग्रीनचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत होता, ज्यामुळे विकेट जाईल. यासाठी बटलर आयपीएलचा आधार घेत त्याला चिढवत होता.

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्रीन याच्यावर आगामी आयपीएल लिलावामध्ये मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचा हा फलंदाज त्याचे आयपीएल पदार्पण करण्यास उत्सुक आहे. मागील काही महिन्यांपासून त्याच्या अष्टपैलू प्रदर्शनाची सर्वत्र चर्चा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये बटलर म्हणतो, ‘मोठा लिलाव होणार आहे’, ज्यावर ग्रीनच्या चेहऱ्यावरही स्मितहास्य दिसते.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी केली. त्यामुळे इंग्लंडने फलंदाजी करताना 50 षटकात 9 विकेट्स गमावत 287 धावा केल्या. ज्याचा यशस्वी पाठलाग ऑस्ट्रेलियाने 46.5 षटकात 6 विकेट्स शिल्लक राखतच पार केला. इंग्लंडकडून डेविड मलान याने 134 धावा केल्या. त्याने 128 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकार खेचत ही खेळी केली. गोलंदाजीत कर्णधार पॅट कमिन्स याने 62 धावा देत 3 आणि ऍडम झंपा याने 55 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथ याने 78 चेंडूत नाबाद 80 धावा केल्या आणि विजय षटकारदेखील खेचत संघाला मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. Players discuss IPL during Australia-England match, Jos Buttler mocks Cameron Green

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीयांनी विदेशी लीग खेळण्याची गरज आहे? वाचा जहीर खान काय म्हणाला
टी20 विश्वचषकानंतर समोर आली नवी क्रमवारी; टीम इंडियाचे हे खेळाडू ‘अर्श’वर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---