---Advertisement---

खेळाडूंनी दिला होता लसीकरणाला नकार, आयपीएलबद्दल धक्कादायक बातमी समोर

On: शनिवार, मे 15, 2021 7:07 PM
---Advertisement---

कोरोनाचे देशात वाढते संक्रमण तसेच खेळाडूंचे कोरोना अहवाल सकारात्मक आल्याने इंडियन प्रीमियर लीग २०२१ अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली आहे. सध्या सनरायझर्स हैदराबादचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याचवेळी, बरेच खेळाडू अद्याप विलगीकरणामध्ये आहेत. या दरम्यान अशी बातमी समोर आली आहे की, आयपीएल २०२१ मध्ये खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास सांगितले होते आणि त्यांनी लस घेण्यास नकार दिला होता.

टाईम्स ऑफ इंडियाने नुकत्याच दिलेल्या वृत्तानुसार, आयपीएलपूर्वी अनेक खेळाडूंनी कोरोना लस घेण्यास नकार दिला होता. आयपीएल फ्रँचायझीद्वारे सर्व खेळाडूंना अनौपचारिक लस देण्याची सोय केली होती. मात्र, खेळाडूंनी यास नकार दिला. या लसीनंतर हलका ताप येण्याची शक्यता असल्याने खेळाडूंमध्ये भीती निर्माण झालेली. यामुळे स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सराव सत्र थांबवावे लागले असते.

एका वृत्तानुसार, खेळाडूंना वाटले की, ते बायो बबलमध्ये इतके सुरक्षित आहे की त्यांना लसी देण्याची गरज नाही. फ्रँचायझींनी या प्रकरणात पुन्हा जास्त जोर दिला नाही.

ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाजी प्रशिक्षक माईक हसी कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरा झाला आहे आणि तो रविवारी मायदेशी परतू शकतो. तर भारतीय यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याचे दोन अहवाल सकारात्मक आले आहेत.

साहा इंग्लंड दौर्‍यावर जाणार्‍या भारतीय संघाचा भाग आहे. त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप व्यतिरिक्त इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका देखील खेळायची आहे. भारतीय संघात सामील होण्यासाठी त्याला २५ मेपूर्वी नेगेटिव्ह अहवाल आणून आपली तंदुरुस्ती सिद्ध करावी लागेल.

महत्त्वाच्या बातम्या –

भारताला ‘या’ ३ गोलंदाजांपासून रहावे लागेल सावध; टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंडकडून घेतल्यात सर्वाधिक विकेट्स

अबब! तब्बल ९१व्या वर्षी क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार ‘हा’ खेळाडू

“मी भारत खूप जवळून पाहिला आहे, यामुळेच यावेळेस केवळ वेदनाच होत नाही तर…”, मॅथ्यू हेडन हळहळला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---