आयपीएल 2020 ही 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून याचा परिणाम क्रिकेटवरही झाला आहे.
आयपीएलमधील काही संघांच्या खेळाडूंनी मात्र एक महिन्यापुर्वीपासूनच सराव सुरु केला होता. यात काही संघांचे प्रदर्शनीय सामने देखील झाले होते. यात धोनी नेतृत्त्व करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचाही समावेश होता.
परंतु भारतीय संघाचा हा माजी कर्णधार कालच सीएसकेच्या सराव शिबीरातून घरी अर्थात रांचीला परतला आहे.
बेंगलोरने आपले सराव शिबीर 21 मार्चपासून सुरु करण्याचे नक्की केले होते. परंतु आता हे सराव शिबीरही रद्द करण्यात आले आहे. कोलकाता नाईट रायडर्स तसेच मुंबई इंडियन्सने यापुर्वीचे आपआपली शिबीरं रद्द केली आहेत.
संघाच्या शिबीरासाठी आलेल्या अनेक खेळाडूंनी आता परतीचा प्रवास सुरु केला आहे. हरभजन सिंगसारख्या मोठ्या खेळाडूंनी आता चेन्नईहुन थेट घरी जाण्यालाच प्राधान्य दिले आहे.
ट्रेडिंग बातम्या-
– कारणंही तशीच होती; इतिहासात भारतातील केवळ ३ वनडे मालिका रद्द झाल्या आहेत
– टीम इंडियाचा हा शिलेदार करणार टी20मध्ये दणदणीत द्विशतक
– संजय मांजरेकरांच्या हाकलपट्टीचं खरं कारण आलं समोर
– टाॅप ५: मांजरेकरांसह इतिहासात हाकालपट्टी झालेले ५ समालोचक