---Advertisement---

परदेशात कसोटी जिंकून देण्यात ‘या’ सहा खेळाडूंचा नादच खुळा, सचिन आसपासही नाही

On: शुक्रवार, जानेवारी 5, 2024 2:59 PM
Virat-Kohli
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने शानदार विजय नोंदवला. हा सामना केपटाऊनमध्ये खेळला गेला. भारतीय संघाच्या विजयात गोलंदाजांसोबतच फलंदाजांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. विराट कोहली याने पहिल्या डावात 46 धावा केल्या होत्या. मात्र दुसऱ्या डावात केवळ 12 धावा करून तो बाद झाला. कोहलीच्या नावावर एक विशेष विक्रम नोंदवला गेला आहे. परदेशी भूमीवर भारताच्या सर्वाधिक कसोटी विजयाचा भाग असलेला तो खेळाडू ठरला आहे.

विराट कोहली (Virat Kohli) भारतीय संघाचा सर्वोत्तम खेळाडू आहे. त्याने अनेक प्रसंगी तुफानी खेळी खेळली आहेत. कोहली परदेशी भूमीवर भारताच्या सर्वाधिक कसोटी विजयाचा एक भाग आहे. त्याने भारतासाठी आतापर्यंत 15 कसोटी सामने जिंकले आहेत. कोहलीने या बाबतीत अनेक दिग्गज खेळाडूंना मागे सोडले आहे. कोहलीसह अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि इशांत शर्मा (Ishant Sharma) दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोघांनी परदेशी भूमीवर 14-14 कसोटी सामने जिंकले आहेत. (Part of most overseas Test Wins for India)

व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Lakshman) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) हेही कोहलीच्या मागे आहेत. लक्ष्मण आणि द्रविड हे परदेशी भूमीवर भारताच्या सर्वाधिक कसोटी विजयांचा एक भाग म्हणून तिसर्‍या स्थानावर आहेत. त्यांनी 13 सामन्यांत भारताच्या विजयाचा वाटा उचलला आहे. तर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने 11 सामने जिंकले आहेत.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना एक डाव आणि 32 धावांनी जिंकला. पण दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली. भारताने हा सामना 7 विकेट्नेस जिंकला. या विजयासह भारतीय संघ जागतीक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2025 च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. (While winning Tests abroad only the names of these five players are open not even Sachin’s name)

हेही वाचा

Ranji Trophy: बिहारच्या युवा क्रिकेटपटूने रचला इतिहास, सचिन तेंडुलकरपेक्षा कमी वयात केले रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण
‘जर असं झालं तर मी निवृत्ती घेईन…,’ ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडूचं धक्कादायक विधान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---