---Advertisement---

विराटच्या पुनरागमनामुळे कोणाला बाकावर बसवणार? अंतिम कसोटीसाठी अशी असेल ‘भारताची प्लेइंग इलेव्हन’

india-test-team
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (south africa vs India)  यांच्यात ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना ११ जानेवारी (मंगळवार) पासून केपटाऊनमध्ये (sa vs Ind 3rd test) खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना जिंकून भारतीय संघाला मालिका आपल्या खिशात घालण्याची संधी आहे. अशातच तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ईलेव्हन? चला पाहूया.

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) दुखापतीमुळे संघाबाहेर होता. त्याच्याऐवजी केएल राहुलला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. आता अंतिम सामन्यात विराट कोहलीचे पुनरागमन होणार आहे, ज्यामुळे हनुमा विहारीला संघाबाहेर व्हावे लागू शकते. हनुमा विहारीने (Hanuma Vihari) दुसऱ्या कसोटी सामन्यात महत्वपूर्ण खेळी केली होती. ज्यामुळे भारतीय संघाला २०० पेक्षा अधिक धावांचा टप्पा गाठण्यात यश आले होते.

व्हिडिओ पाहा- 

सचिनच्या सल्ल्याने पालटली कारकीर्द पण सचिनमुळेच जगभर ट्रोल झालेला Lord Thakur |  Sachin Tendulkar

तसेच चेतेश्वर पुजारा (Cheteshwar pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरले होते. ज्यामुळे जोहान्सबर्ग कसोटी सामना हा त्यांच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला असता. परंतु याच सामन्यात दोघांनी स्वतःला सिद्ध करत अर्धशतकी खेळी केली. यासह शतकी भागीदारी देखील केली. त्यामुळे या दोघांना पुढील कसोटी सामन्यात देखील संधी दिली जाऊ शकते. (playing 11 for Third test against South Africa)

तसेच रिषभ पंत (Rishabh pant) देखील गेल्या सामन्यात फ्लॉप ठरला आहे. त्याने यष्टीमागे २ मोठे विक्रम केले असले तरीदेखील तो फलंदाजीमध्ये साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. तरीदेखील प्रशिक्षक राहुल द्रविड त्याला एक संधी देऊ शकतो. जर रिषभ पंतला संघाबाहेर केले. तर वृद्धीमान साहा हा योग्य पर्याय असू शकतो.

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ईलेव्हेन : केएल राहुल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद रश्मी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव किंवा इशांत शर्मा.

महत्वाच्या बातम्या :

सिडनी कसोटीतील चमकदार कामगिरीनंतर ब्रॉडने बोलून दाखवली मनातील खदखद; म्हणाला…

बुमराहचा चाहता बनला दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज; ‘या’ शब्दांत केली स्तुती

हे नक्की पाहा:

सचिनच्या सल्ल्याने पालटली कारकीर्द पण सचिनमुळेच जगभर ट्रोल झालेला Lord Thakur |  Sachin Tendulkar

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---