भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यात पार शुकवारी (९ जुलै) पहिला टी-२० सामना पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाची फलंदाज हरलीन देओलने अविश्वसनीय झेल टिपला होता. या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच दिग्गज क्रिकेटपटूंनी हा झेल पाहून हरलीन देओलचे कौतुक केले आहे. इतकेच नव्हे तर, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तिचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम स्टोरीला टाकत तिचे अभिनंदन केले आहे.
हरलीन देओलने टिपला अविश्वसनीय झेल
इंग्लंड संघाची फलंदाजी सुरू असताना तिने १९ व्या षटकात अविश्वसनीय झेल टिपला, जे पाहून सर्वांनाच आश्चर्य झाले होते. एमी जोन्सने शिखा पांडेच्या चेंडूवर अप्रतिम शॉट खेळला होता. प्रत्येकाला वाटते होते की, तो चेंडू आरामात सीमारेषेबाहेर ६ धावांसाठी जाईल. परंतु तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या हरलीन देओलने हवेत उडी मारत झेल टिपला. झेल टिपल्यानंतर तिला जाणवले होते की, तिचा पाय सीमारेषेला स्पर्श करणार आहे. त्यामुळे तिने तो चेंडू आत फेकला आणि स्वतः सीमारेषेच्या बाहेर गेली होती. त्यानंतर चेंडू हवेत असतानाच तिने आत येऊन पुन्हा एकदा डाईव्ह मारत झेल टिपला. या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.(Pm narendra modi congratulates Harleen deol on superb catch against England)
https://twitter.com/MazherArshad/status/1413577601445023745?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1413577601445023745%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-indw-vs-engw-t2o-pm-narendra-modi-congratulates-harleen-deol-on-superb-catch-against-england-3652135.html
नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी केले कौतुक
हरलीन देओलचा हा झेल पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही तिचे कौतुक करण्यापासून स्वतःला आवरू शकले नाहीत. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिचा झेल टिपल्याचा व्हिडिओ शेअर केला. तसेच हरलीनला टॅग करत त्यांनी लिहिले की, “अविश्वसनीय, खूपच सुंदर..” तसेच सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग आणि वीवीएस लक्ष्मण यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी देखील तिचे कौतुक केले आहे.
कर्णधार हरमनप्रीत कौरने क्षेत्ररक्षणात सुधारणा झाल्याचे श्रेय दिले प्रशिक्षकांना
भारतीय टी-२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने संघातील खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात झालेल्या सुधारणेचे श्रेय प्रशिक्षक अभय शर्मा यांना दिले आहे. तिने म्हटले की, “खेळाडूंसह वैयक्तिक सराव सत्र आणि उत्कृष्ट रणनीतीचा परिणाम आता दिसू लागला आहे. जेव्हा तुम्ही एक सांघिक खेळ खेळता, तेव्हा तुम्हाला एक लय आणि गतीची आवश्यकता असते. पहिल्या टी-२० सामन्यात माझ्यासोबतही असेच काही झाले होते. जेव्हा मी झेल टिपला त्यामुळे संघात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली होती.” भारतीय आणि इंग्लंड यांच्यात दुसरा टी-२० सामना रविवारी (११ जुलै) खेळला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
रसेलच्या तूफान फटकेबाजीने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा उडाला थरकाप, टी२०त पहिल्यांदाच केला ‘हा’ पराक्रम
फर्स्ट क्लास! ब्रावोने एका हाताने ठोकला कडक सिक्स, गोलंदाजाने नवलाने तोंडात घातली बोटे
सलग दुसऱ्या वनडेत अव्वल फलंदाज आझम सपशेल फ्लॉप, लहाण्या चाहत्याची प्रतिक्रिया व्हायरल