---Advertisement---

फिफाने जाहीर केली क्रमवारी, विश्वचषकातील हा ग्रुप आहे सर्वात तगडा

On: शनिवार, जून 9, 2018 9:00 AM
---Advertisement---

फिफा विश्वचषकाला 14 जूनपासून सुरूवात होत आहे. यातच फिफाने जागतिक क्रमवारी जाहीर केली आहे.

यजमान संघ रशियाची कामगिरी खूपच वाईट असल्याने ते 70व्या क्रमांकावर आहे तर माजी विजेता जर्मनी अव्वल क्रमांकावर आहे. पोलंडला दोन स्थानांचा फायदा झाल्याने तो संघ आता 8व्या क्रमांकावर आहे.

पहिला सामना 14 जूनला रशिया विरूध्द सौदी अरेबिया असा आहे.

ग्रुप प्रमाणे संघांची जागतिक क्रमवारी-

ग्रुप ए- उरूग्वे(14), इजिप्त(45), सौदी अरेबिया(67), रशिया(70)

सरासरी क्रमवारी- 49

रशियाने विश्वचषकाच्या स्पर्धात्मक सामन्यांमध्ये सुमार कामगिरी केल्याने ते 70व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. उरूग्वेची क्रमवारी या ग्रुपमध्ये चांगली आहे.

ग्रुप बी-  पोर्तुगल (4), स्पेन (10), इराण (37), मोरोक्को (41)

सरासरी क्रमवारी – 23

ग्रुप बी मधील दोन संघ जागतिक क्रमवारीत पहिल्या दहामध्ये असल्याने ते सरासरीच्या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांच्यातील पोर्तुगल आणि 2010चा विश्वविजेता स्पेन हे दोन संघ पहिल्या दहामध्ये आहे.

ग्रुप सी-  फ्रांस (7), पेरू (11), डेन्मार्क (12), ऑस्ट्रेलिया (36)

सरासरी क्रमवारी – 16.50

1998चा विश्वविजेता फ्रांस 7व्या क्रमांकावर तर पेरू आणि डेन्मार्क हे पहिल्या वीसमध्ये आहे. सरासरीची क्रमवारी ते ग्रुप इ नंतर दुसऱ्या स्थानावर आहे.

ग्रुप डी- अर्जेंटीना (5), क्रोएशिया (20), आइसलॅंड (22), नायजेरीया (48)

सरासरी क्रमवारी – 23.75

बार्सिलोना स्टार लियोनल मेस्सीचा संघ अर्जेंटीना आणि क्रोएशिया हे या ग्रुपमधील उत्कृष्ट संघ आहेत. विरूध्द संघाना चांगलीच तोड देणारे हे दोन संघ आहेत.  बाराही महिने विश्वचषकाच्या स्पर्धात्मक सामने खेळणारा आफ्रिकेतील नायजेरीया संघाची जागतिक क्रमवारी या ग्रुपमध्ये सगळ्यात खालची आहे.

ग्रुप एच- पोलंड (8), कोलंबिया (16), सेनेगल(27), जपान(61)

सरासरी क्रमवारी – 28

पोलंड आणि कोलंबिया यांच्या स्थानांमध्ये प्रगती झाल्याने त्यांच्या ग्रुपच्या सरासरी क्रमवारीला फायदा झाला  आहे. या विश्वचषका संघामधून जपान जागतिक क्रमवारीत हा शेवटून तिसरा आहे.

ग्रुप जी- बेल्जियम (3), इंग्लंड (12), ट्युनिशिया (21), पनामा (55)

सरासरी क्रमवारी – 22.75

युइएफएच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेला बेल्जियम, सीएएफमध्ये(कॉन्फिडरेशन ऑफ आफ्रिकन फुटबॉल) अव्वल स्थानावर विराजमान असलेला ट्युनिशिया आणि 1966चा विश्वविजेता इंग्लंड हे संघ पनामासाठी अडचणी निर्माण करतील. या तीन संघामुळे रशिया 2018च्या विश्वचषकात हा ग्रुप तिसरा क्रमांकाचा तगडा ग्रुप आहे.

ग्रुप इ- ब्राझिल (2), स्विझरलॅंड (6), कोस्टा रिका (23), सर्बिया (34)

सरासरी क्रमवारी – 16.25

पाच वेळेचा विजेता ब्राझिलला टक्कर देणारा स्विझरलॅंड असे दोन तगडे संघ या ग्रुपमध्ये आहेत. स्विझरलॅंड पात्रता फेरीत फक्त एकच सामना हारला आहे. कोस्टा रिका आणि सर्बिया हे दोन संघ आपापल्या ग्रुपमध्ये पात्रता फेरीत अव्वल होते.

ग्रुप एफ- जर्मनी (1), मेक्सिको (15), स्वीडन (24), दक्षिण कोरीया (57)

सरासरी क्रमवारी-  24.25

जर्मनीच्या पहिल्या क्रमांकानेही हा ग्रुप सरासरी क्रमवारीत शेवटून तिसऱ्या स्थानावर आहे. कॉनकॅकॅफ (द कॉन्फिडरेशन ऑफ नॉर्थ, सेन्ट्रल अमेरिकन अण्ड कॅरेबियन असोसिएशन फुटबॉल) आणि युइएफए (युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन) मधील क्रमवारीत मेक्सिको आणि जर्मनी सर्वोच्च क्रमांकावर आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment