---Advertisement---

ब्रिस्बेन में आप ही खेलो शुक्ला जी! ‘त्या’ ट्विटमुळे सोशल मिडीयावर राजीव शुक्ला होत आहेत ट्रोल

On: बुधवार, जानेवारी 13, 2021 12:54 PM
---Advertisement---

भारतीय संघाने सिडनीतील ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धचा तिसरा कसोटी सामना जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करून अनिर्णीत राखला. चार सत्रातील तब्बल १३१ षटके खेळून काढत भारताने ही अतिशय अवघड कामगिरी साध्य केली. त्यामुळे भारतीय संघाचे सर्वत्र कौतुक होते आहे.

मात्र आश्चर्यकारकपणे या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ट्विट बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी केले. भारतीय संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजांच्या कामगिरीबद्दल त्यांनी नाराजी प्रकट केली.

मात्र त्यांचे हे ट्विट अनेक चाहत्यांना आवडले नाही. भारतीय संघाने एवढी उत्तम कामगिरी केली असतानाही शुक्ला यांनी टीका केल्याने ट्विटरवर त्यांना ट्रोल व्हावे लागले. काही चाहत्यांनी ‘राजकारण्यांना खेळातील काही कळत नाही, त्यामुळे त्यांनी खेळापासून चार हात लांबच राहावे’, असे सुचवले आहे. तर एका चाहत्याने चक्क तुम्हीच ब्रिस्बेनमध्ये खेळायला जा, असेही शुक्ला यांना उपहासाने म्हंटले आहे.

दरम्यान, भारतीय संघाने सिडनीतील सामना अनिर्णीत राखल्याने बॉर्डर-गावसकर मालिकेत १-१ अशी बरोबरी कायम असून, या मालिकेतील चौथ्या सामन्याला १५ जानेवारीपासून ब्रिस्बेनच्या मैदानावर सुरुवात होईल.

महत्वाच्या बातम्या:

टीम इंडियाच्या खेळाडूंच्या तक्रारींची बीसीसीआयकडून दखल, ब्रिस्बेनच्या हॉटेलमध्ये सोयी-सुविधांचा अभाव

मोठी बातमी! भारताची फुलराणी सायना नेहवालचा कोरोना अहवाल निगेटिव्ह; थायलंड ओपनमध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा

धक्कादायक! दहशतवाद्यांच्या बातमीसोबत छापला विराट-अनुष्काचा फोटो, सोशल मीडियावर कडाडून टीका; पाहा फोटो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---