भारतीय महिला संघाने श्रीलंका दौऱ्यात सलग दीन एकदिवसीय सामने जिंकले आहेत. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी (७ जुलै) भारतीय संघाने ३९ धावांच्या अंतराने जिंकला. वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकरने या सामन्यात जबरदस्त प्रदर्शन केले आणि स्वतःच्या नावावर एका खास विक्रमाची नोंदही केली. पूजा आता आठव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक अर्धशतक करणारी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या या तिसऱ्या कसोटी सामन्यात पूजा वस्त्राकर (Pooja Vastrakar) हिने एकूण ६५ चेंडू खेळले आणि ५६ धावा केल्या. भारतीय संघ या सामन्यात चांगली सुरुवात करू शकला नव्हता, परंतु पूजा आणि कर्णधार हमनप्रीत कौरने मोठी भागीदारी केल्यामुळे संघ अपेक्षित धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ९ विकेट्सच्या नुकसानावर २५५ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकन संघ ४७.३ षटकात २१६ धावा करून सर्वबाद झाला.
भारतीय संघासाठी आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना पूजाचे हे दुसरे अर्धशतक आहे. तिने यापूर्वी संघासाठी ९ व्या क्रमांकावर फलंदाजी करतानाही एक अर्धशतक ठोकले होते. अशा प्रकारे आठ किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना पूजाने सर्वाधिक ३ वेळा अर्धशतकी खेली केली आहे. यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्ाय निकोल ब्राउनच्या नावावर होता. निकोलने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना २ अर्धशतक ठोकले आहेत.
उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला तर, भारताची सलामीवीर स्मृती मंधाना अवघ्या ६ धावा करून बाद झाली. याच्यानंतर शेफाली वर्मा (४९) आणि यास्तिका भाटिया (३०) यांनी दुसऱ्या विकेटसाठी महत्वपूर्ण ठरेल अशी ५९ धावांची खेली केली. बारताला यास्तिकाच्या रूपात दुसरा झटका संघाची धावसंख्या ८९ असताना लागला. त्यानंतर संघाने झटपट विकेट्स गमावल्या आणि धावसंख्या झाली ६ विकेट्सच्या नुकसानावर १२४.
कर्णधार हमनप्रीत कौर (७५) आणि पूजा वस्त्राकारने मिळून ९७ धावांची भागीदारी केली, जी संघासाठी खूपच महत्वाची ठरली. हमनप्रीत बाद झाली, पण पूजा मात्र मेघणा सिंग (८), रेणाका सिंग (३) आणि राजेश्वरी गायकावड (३) यांच्यासोबत खेळून संघाला २५० पार घेऊन गेली. नंतर गोलंदाजी करतानाही तीने ७ षटकात ३३ धावा खर्च करून २ महत्वाच्या विकेट्स घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अखेर अर्शदीपला संधी मिळालीच! इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात पदार्पण करण्यास सज्ज
रोहितच्या पुनरागमनानंतर भारताचे नशिब फळफळले! नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
भारताच्या स्टार टेनिसपटूबाबत मोठी बातमी! बहुतेक करियरला पण ‘फुलस्टॉप’