टोकियो ऑलिंपिक २०२०ला शुक्रवारपासून (२३ जुलै) सुरुवात झाली. यातील दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी (२४ जुलै) भारत विरुद्ध चीन यांच्यात टेबल टेनिसचा मिश्र गटातील सामना पार पडला. या सामन्यातून भारताच्या पदक जिंकण्याच्या आशा संपुष्टात आल्या. कारण, शरत कमल आणि मनिका बत्रा मिश्र गटातील अंतिम १६ मध्ये पराभूत झाले. या भारतीय जोडीला तृतीय मानांकन प्राप्त असलेल्या चीन ताइपेच्या लिन युन जू आणि चेंग आय चिंग यांनी ११.८, ११.६, ११.५ आणि ११.४ ने पराभूत केले.
पहिल्या दोन साामन्यात ५.१ आणि ५.३ ने आघाडी घेतल्यानंतर भारतीय जोडी आपली लय कायम ठेवू शकली नाही. पात्रता प्रतिस्पर्ध्यापासून ऑलिंपिकमध्ये स्थान मिळवणारा १९ वर्षीय लिनच्या फ्लँक्सचा १२ व्या मानांकित भारतीय जोडीचा सामना करू शकली नाही.
#TeamIndia | #Tokyo2020 | #TableTennis
Mixed Doubles Round of 16 Results@sharathkamal1 and @manikabatra_TT go down against top seeded Chinese Taipei pair of Lin Yun Ju and Ching Cheng in the 1st Round. Spirited effort by the team! #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/gFnALX81Dl— Team India (@WeAreTeamIndia) July 24, 2021
भारतीय जोडीने पहिल्या सामन्यात ५.१ ने आघाडी घेतली होती. मात्र, यानंतर लिन आणि चेंगने सलग ८ गुण मिळवले. शरत आणि मनिका ऑलिंपिकसाठी रवाना होण्यापूर्वी राष्ट्रीय शिबिरात केवळ ३ दिवस एकत्र खेळले होते. दोघांनीही आशियाई खेळांत कांस्य पदक जिंकून ऑलिंपिकमध्येही पदकाची आशा जागवल्या होत्या. मनिका आणि सुतिर्था मुखर्जी महिला एकेरी स्पर्धेत उतरतील.
महत्त्वाच्या बातम्या-
-भारतीय हॉकी संघाचा न्यूझीलंडवर ३-२ ने दणदणीत विजय, गोलकिपर श्रीजेश ठरला नायक
-भारतीय नेमबाज सौरभ चौधरी चमकला, १० मी. एयर पिस्टल अंतिम फेरीचे मिळवले तिकीट
-आनंदाची बातमी: भारताचा प्रविण जाधव- दिपीका कुमारी जोडी तिरंदाजीत उपांत्यपुर्व फेरीत